5500 कुत्र्यांची नसबंदी
By Admin | Updated: October 5, 2014 00:34 IST2014-10-05T00:34:22+5:302014-10-05T00:34:22+5:30
मोकाट कुत्रे नागरिकांसाठी जीवघेणो ठरत आहेत.

5500 कुत्र्यांची नसबंदी
>नवी मुंबई : मोकाट कुत्रे नागरिकांसाठी जीवघेणो ठरत आहेत. त्यांची वाढत चाललेली पैदास आणि दिवसा आणि रात्रीच्यावेळी नागरिकांना होणा-या त्रसातून सुटण्याकरिता सिडकोकडून कुत्र्यांची नसबंदी करण्याचा धडाका लावला आहे. सिडकोच्या आरोग्य विभागामार्फत आठवडय़ातून तीन दिवस मोकाट कुत्र्यांवर नसबंदी करण्यात येत आहे.
सिडको क्षेत्रतील खारघर, पनवेल, उलवा नोडमध्ये अशाप्रकारची मोहीम सोमवार, बुधवार, शुक्र वार असे तीन दिवस राबवली जात आहे. दिवसाला 3क् कुत्रे पकडून त्यांची नसबंदी करत त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी सोडले जाते. पंधरा महिन्यांच्या कालावधीत सिडको परिसरात साडेपाच हजार मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्यात आली असल्याचे सिडकोचे आरोग्य अधिकारी नंदकिशोर परब यांनी सांगितले. मात्र काही ठिकाणी या मोहिमेला नागरिक आणि प्राणीमित्र विरोध करीत असल्याने मोहीम राबविणो कठीण जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सिडको परिसरात मोकाट कुत्र्यांचा आकडा पंधरा हजारांवर गेला आहे. नागरिकांनी मोकाट कुत्र्यांवरील कारवाईबाबतची तक्रार परिसरातील सिडको विभागीय कार्यालयात लेखी स्वरूपात द्यावी, तसेच ग्रामपंचायत हद्दीतील गावांमधील नागरिकांनी आपली तक्र ार ग्रामपंचायतीमार्फत सिडकोच्या आरोग्य विभागाकडे दिल्यास त्याची तत्काळ कारवाई करेल, असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. पनवेलयेथील गोदीजवळ सिडकोने अत्याधुनिक केंद्रही सुरू केले आहे.(प्रतिनिधी)
आठवडय़ातून तीनवेळा नसबंदी मोहीम राबवतो. त्याअंतर्गत नसबंदीची सर्व प्रक्रि या करून आम्ही पुन्हा कुत्र्यांना त्याच ठिकाणी सोडतो, मात्र काही नागरिक या मोहिमेला विरोध करीत असल्याने आम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
- नंदिकशोर परब,
आरोग्य अधिकारी सिडको