राज्यात शुक्रवारी कोरोनाचे ५४ हजार २२ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:07 IST2021-05-08T04:07:08+5:302021-05-08T04:07:08+5:30

मुंबई : राज्यात शुक्रवारी ५४ हजार २२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४९ लाख ...

54,022 new corona patients in the state on Friday | राज्यात शुक्रवारी कोरोनाचे ५४ हजार २२ नवे रुग्ण

राज्यात शुक्रवारी कोरोनाचे ५४ हजार २२ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात शुक्रवारी ५४ हजार २२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४९ लाख ९६ हजार ७५८ इतकी झाली आहे. दुसरीकडे आज कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ३७ हजार ३८६ इतकी आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४२ लाख ६५ हजार ३२६ लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

एकीकडे नवीन कोरोनाबाधित आणि बरे होणाऱ्यांच्या प्रमाणात चढउतार होत असताना मृतांचा आकडा मात्र वाढतच आहे. आज दिवसभरात ८९८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के इतका आहे. आतापर्यंत एकूण ७४ हजार ४१३ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, राज्यात बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८५.३६ टक्के इतके असून, सध्या राज्यभरात एकूण ६ लाख ५४ हजार ७८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ८९ लाख ३० हजार ५८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४९ लाख ९६ हजार ७५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८ लाख ४१ हजार ४३१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८ हजार ८६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आजचा मृत्यूदर - १.४९ टक्के

आजचे मृत्यू - ८९८

आजचे रुग्ण - ५४,०२२

सक्रिय रुग्ण - ६,५४,७८८

Web Title: 54,022 new corona patients in the state on Friday