मुंबई : दहावीच्या निकालानंतर यंदा अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेलाही गती मिळाली असून शिक्षण संचालनालयाकडून प्रवेशाचे वेळापत्रक आणि ८ विभागांची प्रवेश क्षमता जाहीर करण्यात आली आहे. मुंबईच्या प्रवेश क्षमतेत यंदा ५१ हजार ६४५ जागांची वाढ झाली असून, तो आकडा ४ लाख ६१ हजार ६४० वर पोचली आहे. मागील वर्षी ४ लाख ९ हजार ९९५ जागा उपलब्ध होत्या. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत मुंबईतून ३ लाख २१ हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शिवाय सीबीएसई आणि ‘आयसीएसई’च्या दहावीच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा असल्याने अकरावी प्रवेशासाठी चुरस वाढणार आहे.
यंदा मुंबई विभागात उपलब्ध असलेल्या ४ लाख ६१ हजार ६४० जागांमध्ये कला शाखेसाठी २२ हजार ९५५, वाणिज्य शाखेसाठी २ लाख ७२ हजार ९३०, विज्ञान शाखेसाठी १ लाख ६० हजार ७१५ जागा उपलब्ध आहेत.
वाणिज्य शाखेच्या जागांमध्ये वाढ यंदा मुंबईतील अकरावी प्रवेशाच्या कला शाखेच्या जागांमध्ये मोठी घट झाली आहे. मागील वर्षी कला शाखेसाठी ५३ हजार ६७० जागा उपलब्ध होत्या. मात्र, यंदा ही क्षमता केवळ २२ हजारांवर आली आहे. कला शाखेच्या जागांमधील ही घट ३० हजार ७१५ जागांची आहे. वाणिज्य शाखेच्या जागांमध्ये तब्बल ६१ हजार ८२० जागांची वाढ यंदा करण्यात आली असून त्याची प्रवेश क्षमता १ लाख ७२ हजार ९३० आहे. विज्ञान शाखेसाठी ही जागांची २० हजार ३९५ जागांची वाढ झाली आहे.
प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रकदहावी प्रवेशासाठी २१ मेपासून विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करता येणार असून ३० मे रोजी तात्पुरती, तर ३ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. पहिल्या यादीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १४ जून रोजी दुसऱ्या यादीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर केली जाईल.
प्रवेशासाठी उपलब्ध जागाएकूण क्षमता - ४,६१,६४० कला - २२,९५५ वाणिज्य - २,७२,९३० विज्ञान - १,६०,७१५