Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाच्या मुंबई लॉटरीसाठी ५० हजार आॅनलाइन अर्ज; अल्प, अत्यल्प गटाला सर्वाधिक प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 01:33 IST

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १ हजार ३८४ घरांच्या लॉटरीसाठी सोमवारी रात्री अकरा वाजेपर्यंत तब्बल ५० हजार ०६९ अर्ज दाखल झाले. ४८ हजार ८२१ अर्जदारांनी या लॉटरीसाठी आॅनलाइन नोंदणी पूर्ण केली.

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १ हजार ३८४ घरांच्या लॉटरीसाठी सोमवारी रात्री अकरा वाजेपर्यंत तब्बल ५० हजार ०६९ अर्ज दाखल झाले. ४८ हजार ८२१ अर्जदारांनी या लॉटरीसाठी आॅनलाइन नोंदणी पूर्ण केली. संकेतस्थळ वापरणाऱ्यांची संख्या ६० हजारांच्या आसपास असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे. कोकण मंडळाच्या लॉटरीला अत्यल्प प्रतिसादा मिळाला होता. त्या तुलनेत मुंबई मंडळाला आॅनलाइन लॉटरीत अर्जदारांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.मुंबई मंडळातील आॅनलाइन लॉटरी नोंदणीला ५ नोव्हेंबरला दुपारी २ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. गेल्या दिवसात १,३८४ घरांसाठी अर्जदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. म्हाडाने ग्रँटरोडसारख्या ठिकाणी ५ करोड रुपयांची महागडी घरे विक्रीला ठेवली असली, तरी अशा महागड्या घरांना सोडून मुलुंडमधील गव्हाणपाडा, सायनमधील प्रतीक्षानगर, बोरीवली आणि चांदवलीमधील अत्यल्प २२ आणि अल्प गटातील घरांना आॅनलाइन लॉटरीत चांगला प्रतिसाद मिळत आहे़ या लॉटरीसाठी आॅनलाइन अर्जासाठी नोंदणीची अंतिम तारीख १० डिसेंबरपर्यंत आहे. १६ डिसेंबरला लॉटरी फुटणार आहे.

टॅग्स :म्हाडा