निवृत्त अधिकाऱ्याच्या वेतनात ५० टक्के कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:07 IST2021-09-22T04:07:23+5:302021-09-22T04:07:23+5:30
पदाचा गैरवापर करून ठेकेदारांना मदत केल्याचा ठपका लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पदाचा गैरवापर करून ठेकेदारांना मदत केल्याचा ठपका ...

निवृत्त अधिकाऱ्याच्या वेतनात ५० टक्के कपात
पदाचा गैरवापर करून ठेकेदारांना मदत केल्याचा ठपका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पदाचा गैरवापर करून ठेकेदारांना मदत केल्याचा ठपका असलेल्या उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला निवृत्तीनंतर शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्या निवृत्ती वेतनातून पुढील सात वर्षे ५० टक्के रक्कम रोखून धरण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा अहवाल स्थायी समितीसमोर मांडण्यात आला होता.
मुंबई महापालिकेच्या अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प या विभागाच्या संचालकपदाची जबाबदारी असलेल्या एल. व्हॅटकर यांचा पदाचा कार्यभार १२ जुलै २०१७ पासून खंडित करण्यात आला. त्यांची बदली उपायुक्त पर्यावरण या पदावर पूर्णकालीन करण्यात आली. त्यानंतर संचालक पदाच्या अधिकार क्षेत्रातील कामकाज, कागदपत्रे त्यांनी त्यांच्या जागी नियुक्त झालेल्या संचालकांकडे हस्तांतरित करणे बंधनकारक होते. ते त्यांनी केले नाही. त्यांचे कृत्य नियमबाह्य, गंभीर गैरवर्तनाचे आणि वरिष्ठांच्या आदेशांचे उल्लंघन करणारे असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने नोंदविला आहे. १ जून २०१८ पासून ते सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या निवृत्ती वेतनातून ५० टक्के रक्कम पुढील सात वर्षे रोखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने स्थायी समितीकडे सादर केली आहे.