Join us  

सॉसच्या बाटलीत लपवले ५० लाखांचे सोने! कुवेतमधून मुंबईत आलेल्या प्रवाशाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 11:42 AM

Mumbai Crime News: मेयोनीज सॉसच्या बाटल्यांमधून सोने लपवून आणत त्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका प्रवाशाला मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. तो कुवेत येथून मुंबईत आला होता.

मुंबई  - मेयोनीज सॉसच्या बाटल्यांमधून सोने लपवून आणत त्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका प्रवाशाला मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. तो कुवेत येथून मुंबईत आला होता. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ५० लाख रुपये इतकी आहे.कुवेत येथून मुंबईत दाखल झालेल्या एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला बाजूला घेत त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या पिवळ्या रंगाच्या एका सूटकेसमध्ये मेयोनीज सॉसच्या सहा बाटल्या आढळून आल्या. या बाटल्यांमध्ये असलेल्या सॉसमध्ये सोने लपविल्याची कबुली या प्रवाशाने अधिकाऱ्यांना दिली. त्या सहा बाटल्यांमध्ये मिळून एकूण ८९८ ग्रॅम सोने होते. हे सोने तो मुंबईत एका व्यक्तीला देणार असल्याचे त्या प्रवाशाने अधिकाऱ्यांना सांगितले. तो केवळ हँडलर असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. 

टॅग्स :सोनंतस्करीमुंबई