श्वान निर्बीजीकरणाचा ५०% निधी ५ वर्षे पडून
By Admin | Updated: September 22, 2014 00:48 IST2014-09-22T00:48:33+5:302014-09-22T00:48:33+5:30
भटक्या कुत्र्यांची गणना करताना शस्त्रक्रियेसाठी केंद्राकडून निधीची अपेक्षा ठेवणाऱ्या आरोग्य विभागाचा आणखी एक गलथान कारभार माहिती अधिकारातून पुढे आला

श्वान निर्बीजीकरणाचा ५०% निधी ५ वर्षे पडून
ठाणे : भटक्या कुत्र्यांची गणना करताना शस्त्रक्रियेसाठी केंद्राकडून निधीची अपेक्षा ठेवणाऱ्या आरोग्य विभागाचा आणखी एक गलथान कारभार माहिती अधिकारातून पुढे आला आहे. २००९ पासून २०१४ पर्यंत निर्बीजीकरणासाठी राखून ठेवलेला ५० टक्के निधी खर्च केला नसल्याची बाब समोर आली आहे.
पाच वर्षांत १९,५०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर, आतापर्यंत महापालिका आणि खाजगी संस्थेच्या माध्यमातून ३९ हजार ५१५ भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. परंतु, निर्बीजीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत वारंवार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे उल्हासनगर, नवी मुंबई आणि मुंबई महापालिकेत सुमारे ५०० ते ७५० रुपये निर्बीजीकरणासाठी आकारले जात असताना ठाणे महापालिका मात्र तब्बल १२५० रुपये आकारत असल्याचा मुद्दा मागील दीड वर्षाहून अधिक काळ स्थायी समितीच्या बैठकीत गाजत आहे.