Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रभादेवी पुलाच्या पाडकामासाठी आज मध्यरात्री ५ तासांचा ब्लॉक, चर्चगेट ते दादरदरम्यान सकाळी ६ पर्यंत लोकल बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 11:00 IST

मुंबई : प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळील प्रभादेवी रोड ओव्हर ब्रिजच्या गर्डर डी-लाँचिंगसाठी पश्चिम रेल्वेकडून शनिवारी मध्यरात्री मोठा ब्लॉक घेण्यात येणार ...

मुंबई : प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळील प्रभादेवी रोड ओव्हर ब्रिजच्या गर्डर डी-लाँचिंगसाठी पश्चिम रेल्वेकडून शनिवारी मध्यरात्री मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवारी मध्यरात्री १:३० ते सकाळी ६:०० या वेळेत सर्व मार्गांवर लागू राहणार असून, या कालावधीत चर्चगेट ते दादरदरम्यान उपनगरीय लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

ब्लॉक कालावधीत काही लोकल रद्द करण्यात येणार असून, काही फेऱ्या दादर आणि वांद्रे स्थानकांपर्यंतच मर्यादित ठेवून तेथून माघारी फिरविण्यात येतील. याशिवाय माटुंगा रोड आणि माहीम या स्थानकांवरही ब्लॉकच्या काळात उपनगरीय लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रभादेवी रोड ओव्हर ब्रिजचे पाडकाम करून तेथे दुमजली पूल उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. 

अंतिम टप्प्यात कामजुना पूल पाडण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून सप्टेंबर २०२५मध्ये हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, रेल्वे मार्गावरील कामासाठी आवश्यक असलेला ब्लॉक वेळेवर न मिळाल्यामुळे रेल्वे हद्दीतील काम काही काळ रखडले होते. 

आता पश्चिम रेल्वेकडून आवश्यक ब्लॉक मिळाल्यानंतर गर्डर डी-लाँचिंगचे काम सुरू करण्यात येत आहे. या पुलाच्या पाडकामाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वसई रोड-विरारदरम्यान जम्बो ब्लॉकशनिवारी रात्री १२:१५ ते पहाटे ४:१५ या वेळेत वसई रोड ते विरार या मार्गांवर अप आणि डाऊन लोकल मार्गांवर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत लोकल गाड्या मुख्य जलद मार्गावरून चालवण्यात येतील, ज्यामुळे प्रवासात विलंब होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Prabhadevi Bridge Demolition: Block Tonight, Local Trains Suspended till 6 AM

Web Summary : Western Railway announces a five-hour block for Prabhadevi bridge demolition. Churchgate to Dadar local services will be suspended. Some trains will be cancelled or short-terminated at Dadar and Bandra. Passengers are advised to plan accordingly. A jumbo block will also affect Vasai-Virar locals.
टॅग्स :प्रभादेवीमुंबई