राज्यात काेराेनाचे नवीन ४ हजार ९३० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:16 IST2020-12-03T04:16:30+5:302020-12-03T04:16:30+5:30
मुंबई : राज्यात मंगळवारी काेराेनाच्या ४ हजार ९३० रुग्णांचे निदान झाले असून ९५ मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना ...

राज्यात काेराेनाचे नवीन ४ हजार ९३० रुग्ण
मुंबई : राज्यात मंगळवारी काेराेनाच्या ४ हजार ९३० रुग्णांचे निदान झाले असून ९५ मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या १८ लाख २८ हजार ८२६ झाली असून मृतांचा आकडा ४७ हजार २४६ आहे. दिवसभरात ६ हजार २९० रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण १६ लाख ९१ हजार ४१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४९ टक्के झाले असून मृत्यूदर २.५८ टक्के आहे.
सध्या ८९ हजार ९८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात ५ लाख ३८ हजार ८४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात, तर ६ हजार ४२० व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
...........................