राज्यभरात ४७,८२७ कोरोनाबाधितांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:06 IST2021-04-03T04:06:56+5:302021-04-03T04:06:56+5:30

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांचा आलेख वाढताच आहे. शुक्रवारी दिवसभरात ४७ हजार ८२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ...

47,827 cases of coronary heart disease were reported in the state | राज्यभरात ४७,८२७ कोरोनाबाधितांची नोंद

राज्यभरात ४७,८२७ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांचा आलेख वाढताच आहे. शुक्रवारी दिवसभरात ४७ हजार ८२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आदल्या दिवशीच्या तुलनेत तब्बल पाच हजारांनी रुग्णसंख्या वाढली आहे. सध्या राज्यभरात ३ लाख ८९ हजार ८३२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, दिवसभरात २४ हजार १२६ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत एकूण २४ लाख ५७ हजार ४९४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.६२ टक्के एवढे झाले आहे. दिवसभरात २०२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत ५५ हजार ३७९ नागरिकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी १ लाख ५८ हजार ७१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २९ लाख ४ हजार ७६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१ लाख १ हजार ९९९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर १९ हजार २३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Web Title: 47,827 cases of coronary heart disease were reported in the state