गरिबांना घरासाठी 473 कोटींचा निधी
By Admin | Updated: July 27, 2014 01:54 IST2014-07-27T01:54:44+5:302014-07-27T01:54:44+5:30
राज्य शासनास केंद्राकडून पहिल्या टप्प्यात सुमारे 472 कोटी 99 लाख 68 हजार 1क्क् रुपये इतका निधी मिळाला असून, तो राज्याने संबंधित विभागास वितरित केला आह़े

गरिबांना घरासाठी 473 कोटींचा निधी
नारायण जाधव - ठाणो
ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेचे जीवनमान उंचावून त्यांना हक्काचा निवारा मिळावा, यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी इंदिरा आवास योजनेंतर्गत राज्य शासनास केंद्राकडून पहिल्या टप्प्यात सुमारे 472 कोटी 99 लाख 68 हजार 1क्क् रुपये इतका निधी मिळाला असून, तो राज्याने संबंधित विभागास वितरित केला आह़े हा निधी ऑगस्ट 2क्14र्पयत संपूर्णत: खर्च करण्याचे बंधन ग्रामविकास विभागाने घातले आह़े
यंदा प्रथमच हा निधी थेट जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांना वितरित न करता तो राज्य शासनास एकत्रित मिळाला आह़े
हाच निधी आता जिल्हास्तरावरील ग्रामीण विकास यंत्रणांना राज्य शासनाने तीन वेगवेगळ्या गटांत वितरित केला आह़े यात 29 जिल्ह्यांतील अनुसूचित जातींकरिता 127 कोटी 42 लाख 6क् हजार 3क्क् रुपये तर 19 अनुसूचित जमातींकरिता 217 कोटी 54 लाख 48 हजार आणि 31 जिल्ह्यांतील सर्वसाधारण गटाकरिता 128 कोटी 2 लाख 59 हजार 8क्क् रुपये वितरित करण्यात आले आहेत़
यात कोकण विभागात अनुसूचित जातींकरिता
ठाणो जिल्ह्यास 3 लाख 93 हजार 8क्क् रुपये, रायगड जिल्ह्यास 1 कोटी 6 लाख 31 हजार 3क्क् रुपये, रत्नागिरीस 2 कोटी 7 लाख 63 हजार 8क्क् आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता 5क् लाख 66 हजार 3क्क् रुपये वितरित केले आहेत़
अनुसूचित जमातींकरिता ठाणो जिल्ह्यास 16 कोटी 31 लाख 43 हजार 8क्क् रुपये, रायगड जिल्ह्यास 1 कोटी 7क् लाख 1क् हजार रुपये देण्यात आले असून, रत्नागिरी
आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांस या वर्गास निधी देण्यात आलेला नाही़
सर्वसाधारण गटात ठाणो जिल्ह्यास 1 कोटी 69 लाख 15 हजार 4क्क् रुपये, रायगड जिल्ह्यास 3 कोटी 71 लाख 14 हजार 3क्क् रुपये, रत्नागिरीस 3 कोटी 41 लाख 36 हजार 6क्क् आणि सिंधुदुर्गाच्या वाटय़ाला 1 कोटी 87 लाख 39 हजार 3क्क् रुपये आले आहेत़