४५० मेगावॅट जलविद्युत निर्मिती

By Admin | Updated: February 12, 2015 01:17 IST2015-02-12T01:17:16+5:302015-02-12T01:17:16+5:30

मुंबई शहर आणि उपनगरांत वीजपुरवठा करणाऱ्या टाटा पॉवरने ४५० मेगावॅट जलविद्युत निर्मिती करण्याचा निर्धार शतकपूर्वी वर्षोत्सवाच्या प्रारंभी केला आहे.

450 MW Hydro Power Generation | ४५० मेगावॅट जलविद्युत निर्मिती

४५० मेगावॅट जलविद्युत निर्मिती

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत वीजपुरवठा करणाऱ्या टाटा पॉवरने ४५० मेगावॅट जलविद्युत निर्मिती करण्याचा निर्धार शतकपूर्वी वर्षोत्सवाच्या प्रारंभी केला आहे.
टाटा पॉवरने १९१५ साली त्यांचे पहिले १२ मेगावॅट जलविद्युत निर्मिती संयंत्र कार्यान्वित केले आणि शंभराव्या वर्षात कंपनीने १२० मेगावॅटचा नवा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित करण्याचा संकल्प केला आहे. शिवाय क्लब एनर्जी या ऊर्जा व संसाधने जतनावरील राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून १०० कोटी रुपये वाचविण्यात येणार आहेत. आणि मुंबईकर ग्राहकांसाठी मोफत मोबाइल अ‍ॅप्लिकेशन सेवा सुरू करण्याची योजना आहे, असे टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सरदाना यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 450 MW Hydro Power Generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.