पनवेलमध्ये ४१ धोकादायक इमारती
By Admin | Updated: May 15, 2015 00:38 IST2015-05-15T00:38:56+5:302015-05-15T00:38:56+5:30
काळबादेवी दुर्घटनेनंतर पनवेल नगर परिषदेच्या प्रशासनाला इमारतींबाबत जाग आली. त्यामुळे पनवेल नगर परिषदेने तातडीने ४१ इमारती
पनवेलमध्ये ४१ धोकादायक इमारती
पनवेल : काळबादेवी दुर्घटनेनंतर पनवेल नगर परिषदेच्या प्रशासनाला इमारतींबाबत जाग आली. त्यामुळे पनवेल नगर परिषदेने तातडीने ४१ इमारती या धोकादायक असल्याचे जाहीर करून आपले काम कागदोपत्री पूर्ण केले आहे. परंतु या धोकादायक इमारतींच्या निकषांबाबत पनवेलकरांमध्ये चर्चा सुरू आहे.
सामान्यांवर कोसळणाऱ्या आपत्तीचे पडसाद आपल्या पदावर उमटू नयेत यासाठी पनवेल नगर परिषदेने प्रशासकीय खबरदारी घेतली आहे. ४१ इमारती रहिवाशांना राहण्या योग्य नसल्याने या इमारतींची पाणी व वीज जोडणी खंडित करण्यासंदर्भात नगर परिषदेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र नगर परिषदेने पुनर्वसनाबाबत धोरण स्पष्ट न केल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये शहरात मोक्याच्या जागेवर उभ्या असलेल्या इमारतींचा समावेश आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मिडलक्लास हाऊसिंग सोसायटी, टपालनाका, मोमिन पाडा, लाइन आळी, बापट वाडा आदी ठिकाणच्या इमारतींचा यात समावेश आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोळेश्वर प्राथमिक शाळा या इमारतीही धोकादायक आहेत. (प्रतिनिधी)