Western And Central Railway Ticket Revenue News:पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे मुंबईच्या जीवनवाहिनी आहेत. दररोज लाखो प्रवासी या दोन्ही रेल्वेतून प्रवास करत असतात. मुंबईची लोकल ट्रेन असो वा लांब पल्ल्याचा प्रवास असो, प्रवासी रेल्वेला पहिली पसंती देतात. यातच पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने गेल्या ११ महिन्याच्या कालावधीत फुकट्या प्रवाशांकडून कोट्यवधींचा दंड वसूल केला आहे. यातच मुंबईच्या एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई सीएसएमटी – कसारा, कर्जत, पनवेल, उरण आणि गोरेगावपर्यंत मध्य रेल्वे मार्गावरील लोकल धावते. दिवसाला १ हजार ८१० लोकल फेऱ्यांमधून सुमारे ४३ लाख प्रवासी प्रवास करतात. किफायतशीर आणि वेगवान प्रवासासाठी पसंती असल्याने लोकलला प्रचंड गर्दी असते. याच गर्दीचा फायदा विनातिकिट प्रवासी घेतात. तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिट तपासनीस पकडतात आणि त्यांच्याकडून प्रवासाच्या तिकिटाच्या रक्कमेसह दंड वसूल करतात.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात गेल्या ११ महिन्यांत तब्बल १६ लाख १६ हजार विनातिकिट (फुकटे) प्रवाशांची धरपकड करण्यात आली. या विनातिकिट प्रवाशांकडून ७१ कोटी ३१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी पथकांनी उपनगरीय लोकल, मेल व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये १६ लाख १६ हजार विनातिकिट प्रवाशांची धरपकड केली. गेल्या वर्षी याच कालावधीत १५ लाख ९० हजार विनातिकिट प्रवाशांच्या तुलनेत यंदा २ टक्क्यांनी, तर वसूल केलेल्या दंडाच्या रकमेत ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पश्चिम रेल्वेवर एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सुमारे ३० लाख तिकीट विरहित/अनियमित प्रवासी आढळले. ज्यात १९१ कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला. जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा ४२ टक्के जास्त आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये जवळजवळ ३ लाख तिकीट विरहित/अनियमित प्रवास प्रकरणे आढळून आली आणि १८.५० कोटी रुपयांची वसूल करण्यात आली, जी मागील वर्षाच्या तुलनेत १० टक्के जास्त आहे.
पश्चिम रेल्वेवर फेब्रुवारी २०२६ मध्ये तिकीट विरहित/अनियमित प्रवासाची एकूण ८७,००० प्रकरणे आढळून आली, ज्यामुळे ४.२८ कोटी रुपयांची वसुली झाली. एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुंबई उपनगरीय विभागात एकूण १० लाखांहून अधिक प्रकरणे आढळून आली, ज्यामुळे अंदाजे ५० कोटी रुपये (एसी लोकल ट्रेनमधील दंडासह) वसूल झाले.
दरम्यान, वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या विनातिकिट प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मध्य रेल्वेवर दिवसभरात ९४ वातानुकूलित लोकल चालवल्या जातात. त्यापैकी १४ वातानुकूलित लोकल हार्बर मार्गावर धावतात. वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकिट प्रवाशांची संख्या वाढत आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १.१० लाख विनातिकिट प्रवाशांकडून ३.५१ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. दररोज सरासरी ४०१ फुकट्या प्रवाशांकडून १.२७ लाख रुपये दंड वसूल करण्यात येतो.
Web Summary : Central and Western Railways recovered crores in fines from ticketless travelers. Daily, 400 AC local passengers travel without tickets, costing ₹1.27 lakh in fines. Over 10 lakh cases were found in Mumbai suburban, recovering ₹50 crore.
Web Summary : मध्य और पश्चिम रेलवे ने बिना टिकट यात्रियों से करोड़ों का जुर्माना वसूला। प्रतिदिन, 400 एसी लोकल यात्री बिना टिकट यात्रा करते हैं, जिससे ₹1.27 लाख का जुर्माना लगता है। मुंबई उपनगरीय में 10 लाख से अधिक मामले पाए गए, जिससे ₹50 करोड़ की वसूली हुई।