Western Railway TC News: रेल्वेचे नियम न पाळता विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशात अशा प्रवाशांवर कठोर कारवाई करत मोठ्या प्रमाणावर रेल्वे दंड वसूल करत आहे. पश्चिम रेल्वेवरील दोन तिकीट निरीक्षकांनी अनुक्रमे १.१७ कोटी आणि १.०८ कोटींची दंड वसूल करून रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल, वडोदरा, अहमदाबाद, राजकोट, भावनगर आणि रतलाम या सर्व ६ विभागांमध्ये, तसेच मुख्यालयातील भरारी पथकामध्ये तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी रेल्वे बोर्डाचे लक्ष्य ओलांडून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. चर्चगेट येथील भरारी पथकाचे दोन तिकीट तपासणी कर्मचारी, आशुतोष कुमार सिंग आणि लक्ष्मण कुमार यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे.
उपमुख्य तिकीट निरीक्षक आशुतोष कुमार सिंग यांनी विनातिकीट आणि अनियमित प्रवासाची तसेच नोंद न केलेल्या सामानाच्या प्रकरणांसह अंदाजे १०,००० प्रकरणे उघडकीस आणली आणि १.१७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. त्यांनी दररोज सरासरी ३४ प्रकरणे उघडकीस आणून, सरासरी अंदाजे ४०,००० रुपये वसूल केले.
तसेच उपमुख्य तिकीट निरीक्षक लक्ष्मण कुमार यांनी विनातिकीट आणि अनियमित प्रवासाची, ज्यात नोंद न केलेल्या सामानाच्या प्रकरणांचाही समावेश आहे, अंदाजे १२,८०० प्रकरणे उघडकीस आणली आणि १.०८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. त्यांनी दररोज ४० हून अधिक प्रकरणे उघडकीस आणून अंदाजे ३७,५०० रुपये वसूल केले.
दोन्ही तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची ही उत्कृष्ट कामगिरी त्यांचे समर्पण, नियम व कायद्यांचे सखोल ज्ञान आणि अनियमित प्रवाशांचे प्रभावी व्यवस्थापन दर्शवते. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे महसुलाची गळती कमी होण्यास आणि खऱ्या प्रवाशांसाठी शिस्तबद्ध व न्याय्य प्रवासाचे वातावरण सुनिश्चित करण्यास महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे.
पश्चिम रेल्वे आपल्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची आणि समर्पणाची प्रशंसा करते आणि प्रवाशांचा अनुभव अधिक सुधारण्यासाठी व रेल्वेच्या महसुलाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तिकीट तपासणीची कामे अधिक मजबूत करण्यास कटिबद्ध आहे.
Web Summary : Western Railway TCs achieved record fines, totaling ₹1.17 crore in a year. Two inspectors led, collecting ₹1.17 crore and ₹1.08 crore respectively, by penalizing ticketless travelers and ensuring fair travel.
Web Summary : पश्चिम रेलवे के टीसी ने एक साल में ₹1.17 करोड़ का जुर्माना वसूल कर रिकॉर्ड बनाया। दो निरीक्षकों ने ₹1.17 करोड़ और ₹1.08 करोड़ वसूले, बिना टिकट यात्रियों पर जुर्माना लगाया और उचित यात्रा सुनिश्चित की।