वसतिगृह कर्मचा-यांच्या मानधनात ४0 टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 06:08 IST2017-10-26T06:08:48+5:302017-10-26T06:08:50+5:30
मुंबई : सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून चालविण्यात येणा-या अनुदानित वसतिगृहातील अधीक्षक, स्वयंपाकी, चौकीदार आणि मदतनीसांच्या मानधनात ४0 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला

वसतिगृह कर्मचा-यांच्या मानधनात ४0 टक्के वाढ
मुंबई : सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून चालविण्यात येणा-या अनुदानित वसतिगृहातील अधीक्षक, स्वयंपाकी, चौकीदार आणि मदतनीसांच्या मानधनात ४0 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून महिनाभरात थकीत मानधन अदा जाईल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी दिली.
अनुदानित वसतिगृहातील कर्मचाºयांच्या विविध प्रश्नांसंदर्भात बुधवारी मंत्रालयात मंत्री बडोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस आमदार बच्चू कडूंसह महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी वसतिगृह अधिक्षकांचे मानधन आठवरून बारा हजार, स्वयंपाकींना सहावरून नऊ हजार तर चौकीदार आणि मदतनीसांचे मानधन पाचवरून सात हजार रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बडोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या निर्णयाचा फायदा राज्यातील तब्बल २,३८८ अनुदानित वसतिगृहातील कर्मचाºयांना होणार आहे.