सायबर क्राईमच्या रायगडमध्ये ४० तक्रारी
By Admin | Updated: May 20, 2014 00:58 IST2014-05-20T00:58:15+5:302014-05-20T00:58:15+5:30
सायबर क्राईमचे जाळे दिवसेंदिवस अधिकच वाढत चालले असून रायगड जिल्हाही त्याला अपवाद राहिला नाही. डिसेंबर ते एप्रिल या पाच महिन्यात सायबर क्राईम सेलमध्ये ४० तक्रारींची नोद झाली आहे.

सायबर क्राईमच्या रायगडमध्ये ४० तक्रारी
बोर्ली-मांडला : सायबर क्राईमचे जाळे दिवसेंदिवस अधिकच वाढत चालले असून रायगड जिल्हाही त्याला अपवाद राहिला नाही. डिसेंबर ते एप्रिल या पाच महिन्यात सायबर क्राईम सेलमध्ये ४० तक्रारींची नोद झाली आहे. फेसबूक व इतर सोशल साईटवर अश्लील फोटो अपलोड करणे तसेच नेट बँकिंगच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी या तक्रारी दाखल झाल्या आहेत. डिसेंबर २०१३ ते एप्रिल १४ या पाच महिन्यात क्राईम सेलमध्ये दाखल झालेल्या ४० तक्रारींमध्ये नेट बँकिंगच्या माध्यमातून फसवणूक झाल्याप्रसंगी तीस तक्रारींची नोंद झाली आहे तर अश्लील छायाचित्र फेसबूकवर अपलोड केल्या प्रकरणी तीन तक्रारी आहेत. ५ इतर माध्यमातून छायाचित्र अपलोड केल्याच्या तक्रारी आहे. अन्य दोन तक्रारी कोणत्या कारणास्तव दाखल आहेत याची माहिती उपलब्ध होवू शकली नाही. या आकडेवारीमुळे रायगड जिल्ह्यातही सायबर क्राईमने आपले पाय पसरायला सुरुवात केल्याचे उघड झाले आहे. रायगड जिल्हा हा दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या प्रगत होत चालला आहे. त्यासोबत परप्रांतीयांचे लोंढेही या जिल्ह्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणात येवू लागले आहे. जिल्ह्यातील सायबर क्राईमचे प्रामणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जिल्ह्यातील रहिवाशांना बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली यासह इतर राज्यातून मोठ्याप्रमाणात दिशाभूल करणारे कॉल केले जातात. दिशाभूल करणारीही माहिती विचारली जाते. नागरिकांच्या बँक खात्याची माहितीसुध्दा घेतली जाते, त्यामुळे रायगडवासीयांनी अशा फसव्या कॉल्सना बळी पडू नये. (वार्ताहर)