क्राईर्म थोडक्यात....४ बातम्या.....

By Admin | Updated: August 31, 2014 22:51 IST2014-08-31T22:51:46+5:302014-08-31T22:51:46+5:30

हुक्का पार्लरवर छापा

4 news articles » | क्राईर्म थोडक्यात....४ बातम्या.....

क्राईर्म थोडक्यात....४ बातम्या.....

क्का पार्लरवर छापा
मुंबई : हुक्का पार्लरवर बंदी असताना अंधेरीच्या जेपी रोड परिसरात हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली. त्यानुसार शुक्रवारी रात्री येथील कार्ल कॅफे या पार्लरवर समाजसेवा शाखेने छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी १७ पुरुष, ७ महिला, १ मॅनेजर आणि इतर ३ जण अशा एकूण २८ जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या पार्लरमधून काही सामान आणि १० हजार रोख असा मुद्देमालदेखील हस्तगत केला आहे.
.......................................................
कुरिअरबॉयला अटक
मुंबई : कुरिअरच्या चौकशीसाठी आलेल्या महिलेला शिवीगाळ करून तिच्यासोबत अश्लील वर्तन करणार्‍या कुरिअर बॉयला एमआरए मार्ग पोलिसांनी अटक केली. हज हाउस परिसरात असलेल्या या कुरिअर कंपनीत महिला गुरुवारी कुरिअर संदर्भात विचारणा करण्यासाठी गेली होती. या वेळी येथील चेतन खेराडियासोबत महिलेची बाचाबाची झाली होती.
.....................................................
सोनसाखळी चोर अटकेत
मुंबई : महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी घेऊन पळ काढणार्‍या सराईत आरोपीला दादर पोलिसांनी अटक केली. शंकर बेबाली (२६) असे या आरोपीचे नाव असून, तो एका महिलेची सोनसाखळी घेऊन पळ काढत होता. याच वेळी दादर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय काटे, हवालदार पांडुरंग माने यांनी या चोरट्याचा पाठलाग करून त्याला अटक केली. पोलिसांच्या या कामगिरीबाबत अपर पोलीस आयुक्त आर.डी. शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला आहे.
............................................
अंधेरीतील बारवर छापा
मुंबई : अंधेरीतील रेणुका बारवर शुक्रवारी रात्री समाजसेवा शाखेने छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी ५ बारबालांची सुटका केली असून, २२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या बारमध्ये अश्लील वर्तन सुरू असल्याची माहिती समाजसेवा शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांना छापा टाकला. सर्व आरोपींवर अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
............................................

Web Title: 4 news articles »

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.