एक्स्प्रेस-वेवरील अपघातात 4 ठार
By Admin | Updated: September 16, 2014 03:04 IST2014-09-16T03:04:42+5:302014-09-16T03:04:42+5:30
पंक्चर काढण्यासाठी खालापूर तालुक्यातील टेंभरी गावाजवळ थांबलेल्या टेम्पोला एका अवजड वाहनाने धडक दिल्यामुळे 4 जण ठार झाले तर 4 जखमी झाले.

एक्स्प्रेस-वेवरील अपघातात 4 ठार
खालापूर : पंक्चर काढण्यासाठी खालापूर तालुक्यातील टेंभरी गावाजवळ थांबलेल्या टेम्पोला एका अवजड वाहनाने धडक दिल्यामुळे 4 जण ठार झाले तर 4 जखमी झाले.
पुण्याहून बांधकाम मजूर घेऊन मुंबईकडे येणारा टेम्पो टेंभरी गावाजवळ पंक्चर झाला. पंक्चर काढण्याचे काम सुरू असताना मागून आलेल्या अवजड वाहनाने टेम्पोला जोरदार धडक दिली. त्यामुळे टेम्पोजवळ उभे असणारे हल्दार
भगवान महतो (42), यल्लाप्पा
पुजारी (35), सिद्धेश मोहन पाटील (25) या तिघांसह आणखी एक जण (नाव कळू शकले नाही) चिरडला गेला आणि या चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
अन्य चार गंभीर जखमींना कळंबोलीतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व जण मूळचे कर्नाटकचे मजूर आहेत. धडक देणा:या वाहनाचा शोध सुरू असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतिग्रे यांनी सांगितले.
गनियमांचे सर्रास उल्लंघन
लग्नाचे व:हाड घेऊन जाणारी बस बंद पडली असता, तिला
एका वाहनाची धडक बसून 27
जण ठार झाल्याचा प्रकार दोन वर्षापूर्वी घडला होता. त्या
वेळी वाहतूक पोलिसांनी एक्स्प्रेस-वेवर सुरक्षित वाहतुकीसाठी काही नियम पाळण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र वाहनचालकांकडून
या नियमांचे सर्रास उल्लंघन होत
आहे. (वार्ताहर)