Join us  

मुंबई विमानतळावर पकडले ४ किलो सोने; सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई

By मनोज गडनीस | Published: March 13, 2024 5:48 PM

आखाती देशांतून गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर भारतात सोन्याची तस्करी उघडकीस येत आहे.

मुंबई - अबुधाबी, बाहरिन, जेद्दा येथून मुंबई विमातळावर दाखल झालेल्या आठ प्रवाशांकडून ४ किलो सोने जप्त करत मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने सोने तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या एकूण सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत दोन कोटी ३५ लाख रुपये इतकी आहे. याचसोबत काही आयफोन्स व लॅपटॉप देखील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे.

आखाती देशांतून गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर भारतात सोन्याची तस्करी उघडकीस येत आहे. जे सोने पकडण्यात आले आहे ते सोन्याची पावडर तसेच सोन्याची पेस्ट या स्वरुपात आहे. गेल्यावर्षी अशाच प्रकारे सोन्याची पावडर व सोन्याची पेस्ट तस्करीद्वारे मुंबईत आणण्यात आली होती व मुंबईत या सोन्यावर प्रक्रिया करणारा कारखाना देखील तपास यंत्रणांनी पकडला होता. मात्र, नववर्षात पुन्हा एकदा याच स्वरुपात मोठ्या प्रमाणावर सोने पकडले जात आहे. या कारवाई दरम्यान १२ आयफोन आणि ३ सॅमसंग कंपनीचे फोन्स व लॅपटॉप देखील पकडण्यात आले आहेत. दरम्यान, तस्करीद्वारे आणलेले सोने हे कपड्यात, पाकीटात, बॅगेत चोर कप्पे तयार करत त्यात दडविल्याचे आढळून आले आहे. या आठ प्रकरणांतील बहुतांश आरोपी हे भारतीय नागरिक आहेत.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस