Join us

मोठी बातमी! मुंबईतील वरळीमध्ये निर्माणाधीन इमारतीची लिफ्ट कोसळली; ४ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 19:34 IST

अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी; बचावकार्य सुरू

मुंबई: मुंबईतील वरळीमध्ये निर्माणाधीन इमारतीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. इमारतीची लिफ्ट कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून त्यांच्याकडून मदतकार्य सुरू आहे. पार्किंगचं बांधकाम सुरू असताना लिफ्ट कोसळल्याची घटना घडली. 

वरळी भागात एका निर्माणाधीन इमारतीची लिफ्ट संध्याकाळच्या सुमारास कोसळली.अंबिका बिल्डर्स शंकरराव पदपथ मार्ग, बीडीडी चाळ, हनुमान गल्लीत ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर अजूनही ६ जण आतमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने केईएम हॉस्पिटल आणि नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

घटनास्थळी अग्नीशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत पार्किंगचे बांधकाम सुरू होतं. त्याच दरम्यान लिफ्ट कोसळली. दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून आत अडकलेल्या ६ जणांची सुटका करण्याचं काम सुरू आहे.