उल्हासनगरात 378 जणांना वायुबाधा
By Admin | Updated: November 30, 2014 02:28 IST2014-11-30T02:28:55+5:302014-11-30T02:28:55+5:30
शहरातील वालधुनी नदीतून येणा:या उग्र दर्पाने पहाटे 4च्या सुमारास नदी किना:यानजीकच्या 378 जणांना उलटय़ा, मळमळने, श्वास घेण्यास त्रस होणो, पोट दुखणो, चक्कर येणो आदी त्रस झाला.

उल्हासनगरात 378 जणांना वायुबाधा
वालधुनी नदीतून उग्र दर्प : उलटय़ा, मळमळ, श्वास घेण्यास त्रस, पोटदुखीने नागरिक त्रस्त
उल्हासनगर : शहरातील वालधुनी नदीतून येणा:या उग्र दर्पाने पहाटे 4च्या सुमारास नदी किना:यानजीकच्या 378 जणांना उलटय़ा, मळमळने, श्वास घेण्यास त्रस होणो, पोट दुखणो, चक्कर येणो आदी त्रस झाला. त्यामुळे सम्राट अशोकनगर, वडोल गाव, रेणुका सोसायटीतील शेकडो नागरिकांनी मिळेल त्या वाहनाने रुग्णालय गाठले.
मध्यवर्ती रुग्णालयात-195, शिवनेरी रुग्णालय-83, सर्वानंद रुग्णालय-74, कामगार रुग्णालयात-21 तर त्रिमूर्ती रुग्णालयात-5 अशा एकूण 378 जणांवर उपचार करण्यात आले. दुपारनंतर बहुतेक नागरिकांना घरी पाठवण्यात आले. दीपक भुपे यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले आहे. तर हसिना शेख यांना मुंबई येथील सायन रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
वालधुनी नदीपात्रत रसायने व जीन्सचे कारखाने आहेत. त्यांचे सांडपाणी व शहरातील सांडपाणी सोडल्यामुळे नदी अतिशय प्रदूषित झाली आहे.
नदीतील विषारी दर्पाचा त्रस नेहमी होत असल्याची माहिती स्थानिक नगरसेविका व उपमहापौर पंचशीला पवार यांनी दिली आहे. या पूर्वीही नदीत विषारी रासायनिक सांडपाणी सोडत असल्याचे प्रकार घडले आहेत.