कोरोनाचे राज्यात ३७, तर मुंबईत १९ नवीन रुग्ण, २ रुग्ण रुग्णलयात दाखल
By संतोष आंधळे | Updated: December 26, 2023 21:09 IST2023-12-26T21:09:08+5:302023-12-26T21:09:21+5:30
दिवसभरात ११४ चाचण्या करण्यात आल्या.

कोरोनाचे राज्यात ३७, तर मुंबईत १९ नवीन रुग्ण, २ रुग्ण रुग्णलयात दाखल
मुंबई : राज्यात काही दिवसापासून नवीन रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये सोमवारी राज्यात एकूण ३७ नवीन रुग्णांनाची नोंद करण्यात त्यातील १९ रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत. त्यामुळे राज्यात १९४ आणि मुंबईत ८८ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आज ११ जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत जे १९ रुग्ण सापडले आहेत त्यापैकी २ रुग्णांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात सध्याच्या घडीला कोरोना करिता राखीव असणाऱ्या ४२१५ बेड्स पैकी ९ बेड्स वर रुग्ण दाखल आहेत. दिवसभरात ११४ चाचण्या करण्यात आल्या.
नव्याने नोंद झालेले महामुंबईतील रुग्ण
मुंबई मनपा - १९
ठाणे मनपा - १
नवी मुंबई - २
रायगड - २