Join us

राज्यात ३७, तर मुंबईत १९ नवीन कोरोनाचे रुग्ण; JN1 व्हेरिएंटचा एकही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 06:13 IST

११ जण बरे होऊन घरी गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यात काही दिवसांपासून कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी ३७ नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यातील १९ रुग्ण हे मुंबईतील आहेत. राज्यात आता १९४ आणि मुंबईत कोरोनाचे ८८ सक्रिय रुग्ण आहेत. मंगळवारी ११ जण बरे होऊन घरी गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत आढळलेल्या १९ रुग्णांपैकी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात राखीव असणाऱ्या ४,२१५ बेड्सपैकी ९ बेड्सवर रुग्ण दाखल आहेत. दिवसभरात ११४ चाचण्या करण्यात आल्या. मंगळवारी जे. एन. वन व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस