कल्याणमध्ये ३६३ रिक्षांवर कारवाई !
By Admin | Updated: August 10, 2015 23:27 IST2015-08-10T23:27:40+5:302015-08-10T23:27:40+5:30
नियमांचे पालन न करणाऱ्या रिक्षावाल्यांवर कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने बडगा उगारून सुमारे चार महिन्यांत ३६३ रिक्षांवर कारवाई करण्यात आली. यामुळे कल्याण, डोंबिवली परिसरातील

कल्याणमध्ये ३६३ रिक्षांवर कारवाई !
ठाणे : नियमांचे पालन न करणाऱ्या रिक्षावाल्यांवर कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने बडगा उगारून सुमारे चार महिन्यांत ३६३ रिक्षांवर कारवाई करण्यात आली. यामुळे कल्याण, डोंबिवली परिसरातील मुजोर रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहेत.
या कालावधीत १०१ जणांचे परवाने निलंबित तर ९६ जणांच्या परमिटवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी सांगितले.
या कालावधीत जादा प्रवासी घेतल्याबद्दल १७८ रिक्षांवर तर भाडे नाकारल्याच्या कारणावर नऊ
जणांवर कारवाई झाली आहे. याशिवाय, १५९ रिक्षाचालकांवर विविध कारणांखाली कारवाई झाली आहे.मुजोर रिक्षावाल्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असता त्यांच्याकडून चार लाख ९४ हजार ८०० रु पये तडजोड शुल्क तर १३ हजार ५०० न्यायालयीन दंड म्हणून रक्कम वसूल करण्यात आली. तरी रिक्षांची एकूण संख्या पाहता ही कारवाई तशी नगण्य ठरणारी आहे.
(प्रतिनिधी)