३६ वर्र्षाचे सेवाकार्य : नव्या संकल्पनेला हवाय मदतीचा हातभार
By Admin | Updated: August 18, 2014 23:24 IST2014-08-18T22:12:07+5:302014-08-18T23:24:12+5:30
दिलीपसिंहराजे घाटगे बालग्राम, पन्हाळा -सामाजिक ऋण

३६ वर्र्षाचे सेवाकार्य : नव्या संकल्पनेला हवाय मदतीचा हातभार
दिलीपसिंहराजे घाटगे बालग्राम, पन्हाळा
३६ वर्र्षाचे सेवाकार्य : नव्या संकल्पनेला हवाय मदतीचा हातभार
दुसरे महायुद्ध संपले आणि जगाला एका नव्या समस्येने ग्रासले. युद्धामुळे अनाथ, विधवा झालेल्यांचे पुनर्वसन होणे गरजेचे होते. कोणाचाही कसलाही संबंध नव्हता, तरीही युद्धाचे परिणाम या सगळ्यांना भोगावे लागले. या समस्येवर मात करण्यासाठी लहान मोठ्या संस्थांनी हातभारही लावण्यास सुरवात केली आणि बघता बघता अनाथाश्रम, महिलाश्रम, वृद्धाश्रम यांची संख्या गगनाला पोहोचली.
आॅस्ट्रीयात एक तरुण तेव्हा डॉ. हर्मन मायनर युद्धजन्य भाग फिरण्यासाठी म्हणून घराबाहेर पडला. परिस्थिती पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले, मात्र क्षणातच अनाथ बालकांसाठी काही तरी केले पाहिजे हा विचार त्याच्या काळजाला भिडला. जीव बैचेन झाला आणि मग त्याने राहत्या घरात आपण या अनाथ बालकांना ठेवायचे ठरविले. डॉ. मायनर याला सहा भाऊ व बहिण असा परिवार होता. या मुलांना नवे घर व आई-बाबा देवू शकतो अशी नवी कल्पना त्याला सुचली. खुद्द
डॉ. मायनर हे त्या मुलांचे बाबा झाले. यातूनच नवी संकल्पना उभी झाली जिचे नाव होते एसओएस. म्हणजेच आमचा आत्मा वाचवा.
भारतानेही या नव्या संकल्पनेचा स्वीकार केला. एसओएसच्या धर्तीवर त्यावेळचे समाजकल्याण खात्याचे संचालक (१९७०) व राज्याचे माजी इन्स्पेक्टर जनरल आॅफ प्रीझेन कै.डी. जे. जाधव यांनी बालग्राम ही नवी संकल्पना महाराष्ट्रात उभारली आणि पुणे येथे २० घरांचा २०० मुला-मुलींचा नवा प्रयोग साकार केला.
जाधवबाबा हे मुळचे कोल्हापूरचे असल्याने राहत्या गावी अशी संस्था असावी असा विचार त्यांच्या मनात आल्याने बिन भिंतीचे बालग्राम त्यांनी पन्हाळा येथे सुरु केले. कुटुंब व्यवस्थेवर आधारित नवे बालग्राम पन्हाळा येथे ३१ मे १९७७ रोजी श्री दिलीपसिंह राजे घाटगे बालग्राम, पन्हाळा या नावे सुरु झाले. आज पन्हाळा येथील श्रीमंत विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या कागलकर वाड्यात ही संस्था गेली ३६ वर्षे आपले काम उत्तमपणे पार पडत आहे. श्रीमंत विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या कडून हा वाडा बालसंगोपनाच्या कायार्साठी विनामुल्य कै. डी. जे. जाधव यांना प्राप्त झाला आणि यातूनच बालग्राम ही नवी चळवळ कोल्हापुरात चालू झाली. एकंदरीत अनाथ मुलांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा बालग्राम हा एक उत्तम प्रयोग आहे. हे केवळ समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांमुळेच शक्य झाले आहे.
-संदीप आडनाईक
या मुलांना एका सक्षम भारताचे आदर्श नागरिक बनविण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. यासाठी आपले आशीर्वाद या मुलांच्या पाठी राहोत. या मुलांच्या उमलत्या जीवनाला भक्कम आधार आणि आशीर्वाद मिळावा. आयुष्यातील एक दिवस आपण नक्कीच बालग्रामसाठी द्याल यात शंका नाही.
- संतोष गायकवाड
अधिक्षक, बालग्राम, पन्हाळा
गरज दात्यांच्या सहकार्याची
बालग्राम हा अनाथाश्रम पेक्षा वेगळा प्रयोग असल्याने सर्व पन्हाळा वासियांनी या संकल्पनेचे स्वागत केले. पन्हाळा येथील बालग्राममध्ये आज तीन घरे आहेत. या घरांत ३० मुले राहतात. प्रत्येक घरात एक आई आहे. या आईने १० मुलांचे एक घर सांभाळायचे असते. या आईने त्या १० मुलांचे सर्व काही करायचे जे आपली आई आपल्या कुटुंबात आपल्या मुलांसाठी करते, आणि मुलांनीही ही आपली आई आहे म्हणूनच राहायचे असते. येथे घरातील सर्व सुविधा ह्या मुलांसाठी मोफत असतात. येथे प्रत्येक सण आपल्या घरातील वातावरणाप्रमाणे साजरा होतो. बालग्राम मधील प्रत्येक विद्यार्थ्यास एक दाता आहे. या दात्याद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याचा खर्च भागवला जातो. सध्या संस्थेतील १५ विद्यार्थ्यांना नियमित दरमहा मदत करणारे दाते उपलब्ध आहेत. उर्वरित मुलांनाही उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न चालू आहे.
बालग्राममध्ये मिळतील बहिण-भाऊ
एक घरामध्ये एक आई व १० मुले व मुली ज्यामध्ये विधवा महिलेस आई होण्याचा मान मिळेल, तिचेही पुनर्वसन होईल व १० मुले आणि मुलीना एक घर मिळेल. आई व नवे बहिण-भाऊ मिळतील. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही नवी संकल्पना सुरु झाली व पाहता पाहता संपूर्ण जगाने डॉ. मायनर यांच्या नव्या संकल्पनेचे स्वागत झाले. आता हे अनाथाश्रम नसून हक्काचे घर आहे ही नवी भावना जगात निर्माण झाली आहे.
बालग्राममध्ये मिळतील बहिण-भाऊ
एक घरामध्ये एक आई व १० मुले व मुली ज्यामध्ये विधवा महिलेस आई होण्याचा मान मिळेल, तिचेही पुनर्वसन होईल व १० मुले आणि मुलीना एक घर मिळेल. आई व नवे बहिण-भाऊ मिळतील. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही नवी संकल्पना सुरु झाली व पाहता पाहता संपूर्ण जगाने डॉ. मायनर यांच्या नव्या संकल्पनेचे स्वागत झाले. आता हे अनाथाश्रम नसून हक्काचे घर आहे ही नवी भावना जगात निर्माण झाली आहे.
येथूनच घडले त्यांचे जीवन...
३६ वर्षाच्या कालावधीत बालग्राममधून बाहेर पडलेली मुले उत्तुंग भरारी घेत चांगले जीवन जगत आहेत.
बालग्राममधील मुले आज सरकारी अधिकारी पोलीस, शिक्षक, अभियंता, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर झालेली आहेत. काही मुले परदेशात आहेत.
कित्येक मुले मुंबई, पुण्यात स्वत:च्या नव्या घरात सपत्नीक उत्तम जीवन जगत आहेत.
बालग्रामचे सध्याचे अधीक्षक संतोष गायकवाड हे देखील याच संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत.
बालग्राममध्ये आयुष्यातील २० वर्षे काढल्यानंतर गायकवाड यांनी बालग्रामद्वारे एम.ए.बीएड चे शिक्षण पूर्ण केले आणि आज ते अधीक्षक म्हणून काम करीत आहेत. खऱ्या अर्थाने हेच बालग्रामचे फलित म्हणावे लागेल.