ओमानमध्ये अडकलेल्या ३६ भारतीय कामगारांची सुखरूप सुटका, पीयूष गोयल यांच्या प्रयत्नांना यश
By मनोहर कुंभेजकर | Updated: October 7, 2025 21:23 IST2025-10-07T21:23:12+5:302025-10-07T21:23:33+5:30
36 Indian Worker released: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "परदेशात अडचणीत सापडलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला शक्य ती मदत आणि सुरक्षा देण्याच्या" धोरणातून प्रेरणा घेऊन, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या त्वरित हस्तक्षेपामुळे ओमानमध्ये गंभीर अडचणीत सापडलेल्या ३६ भारतीय कामगारांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली आहे.

ओमानमध्ये अडकलेल्या ३६ भारतीय कामगारांची सुखरूप सुटका, पीयूष गोयल यांच्या प्रयत्नांना यश
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "परदेशात अडचणीत सापडलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला शक्य ती मदत आणि सुरक्षा देण्याच्या" धोरणातून प्रेरणा घेऊन, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या त्वरित हस्तक्षेपामुळे ओमानमध्ये गंभीर अडचणीत सापडलेल्या ३६ भारतीय कामगारांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, भाजप उत्तर मुंबई वार्ड क्र. २४ चे अध्यक्ष गोविंद प्रसाद यांनी या प्रकरणाबाबत पीयूष गोयल यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला होता. त्यांनी माहिती दिली की, ओमानमधील १८ भारतीय कामगार, ज्यात त्यांच्या एका नातेवाइकाचा समावेश आहे, अत्यंत दयनीय परिस्थितीत राहत असून, नियोक्त्यांकडून शोषणाला सामोरे जात आहेत.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत, गोयल यांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना सर्वोच्च प्राधान्याने कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या कार्यालयाने तात्काळ ओमानमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून मदतीची विनंती केली.
दूतावासाने स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने केवळ त्या १८ नव्हे, तर अशाच अवस्थेत अडकलेल्या आणखी १८ भारतीय नागरिकांचा शोध घेतला. सर्व ३६ कामगारांना तत्काळ सुरक्षित स्थळी, स्थानिक गुरुद्वारात हलविण्यात आले व त्यांना आवश्यक तात्पुरता आश्रय देण्यात आला. काही दिवसांतच सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांना भारतात परत पाठविण्यात आले.
या कामगारांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, महिनोंपासून पगार न मिळाल्याने आणि पासपोर्ट काढून घेतल्यामुळे पूर्णपणे असहाय्य वाटत होते. त्यांच्या सुटकेसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे सरकारच्या ‘एकही भारतीय परदेशात अडचणीत असता मदतीशिवाय राहणार नाही’ या भूमिकेची पुन्हा एकदा ठाम पुष्टी झाली आहे. “भारतीय नागरिकांचे कल्याण, सन्मान आणि सुरक्षा हेच केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे,” असे पीयूष गोयल यांनी या यशस्वी सुटकेनंतर म्हणाले.