रस्त्यांवर 35 हजार अवैध रिक्षा

By Admin | Updated: December 11, 2014 00:58 IST2014-12-11T00:58:00+5:302014-12-11T00:58:00+5:30

मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांतील रस्त्यांवर सुमारे 35 हजार अवैध ऑटोरिक्षा धावत असल्याचा आरोप मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनने केला आहे.

35 thousand illegal auto-rickshaws in the streets | रस्त्यांवर 35 हजार अवैध रिक्षा

रस्त्यांवर 35 हजार अवैध रिक्षा

मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनचा आरोप : प्रशासन, वाहतूकदारांमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप 
मुंबई : मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांतील रस्त्यांवर सुमारे 35 हजार अवैध ऑटोरिक्षा धावत असल्याचा आरोप मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनने केला आहे. प्रशासनासोबत असलेल्या मिलीभगतमुळेच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असल्याचा आरोपही संघटनेने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
संघटनेचे साहाय्यक सरचिटणीस शशांक राव म्हणाले, ‘वारंवार संघटनेमार्फत प्रशासनाला अवैध वाहतुकीच्या तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र तात्पुरती कारवाई करणारे प्रशासन केवळ दंडात्मक कारवाई करून शांत बसत आहे. त्यामुळे पाच वर्षापूर्वी 1क् हजारांचा आकडा असलेल्या अवैध वाहतुकीने आज 4क् हजारांर्पयत मजल मारली आहे. ही अवैध वाहतूक मुंबईतील प्रवाशांसोबत रस्त्यावरून चालणा:या नागरिकांच्या जिवासाठी धोकादायक आहे. कारण अवैध वाहतुकीत नोंदणी रद्द झालेल्या ऑटोरिक्षांसोबत इतर चारचाकी गाडय़ांचाही समावेश आहे.’
वांद्रे, कुर्ला, बोरीवली या रेल्वे स्थानकांसोबतच बाहेरील प्रवाशांची गर्दी असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर अवैध प्रवासी वाहतूक मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याचा दावा संघटनेने केला आहे. प्रवाशांना भाडे नाकारणो, अवाजवी भाडे वसूल करणो, असे प्रकारही संबंधित अवैध प्रवासी वाहतूकदारांकडून सुरू आहे. मात्र त्याचा दोष प्रामाणिकपणो काम करणा:या रिक्षाचालक आणि वाहतूकदारांवर होत आहे.’दिल्लीतील घटनेची पुनरावृत्ती मुंबईत होऊ नये, म्हणून प्रशासनाने कारवाई करून नोंदणी रद्द झालेल्या रिक्षा स्क्रॅपमध्ये काढण्याची मागणी संघटनेने केली आहे. त्यासाठी संघटनेने कार्यकत्र्याची फौज मदतीसाठी तत्पर असल्याचेही सांगितले. अवैध प्रवासी वाहतूक  प्रशासन आणि वाहतूकदारांमधील साटेलोटे असल्याचा संघटनेचा आरोप आहे. (प्रतिनिधी)
 
प्रशासनाला 
संघटनेचे आव्हान
पत्रकार परिषदेत संघटनेने शहर आणि उपनगरांतील अवैध प्रवासी वाहतूक सुरू असलेल्या काही ठिकाणांची नावे प्रसिद्ध केली. शिवाय प्रशासनाने त्या ठिकाणी कारवाई करूनच दाखवावी, असे आव्हानही दिले आहे.
 
विशेष पथकाची स्थापना करा
अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी विशेष पथकाची स्थापना करण्याची मागणी संघटनेने केली आहे. त्या समितीत पोलीस, आरटीओ आणि वाहतूक पोलिसाचा समावेश करावा. अवैध वाहतुकीची ठिकाणो दाखवण्यात संघटना त्यांना मदत करेल, असेही संघटनेने सांगितले.
 
प्री-पेड ऑटोरिक्षा बूथ उभारा : कुर्ला टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, अंधेरी रेल्वे स्थानक, बोरीवली रेल्वे स्थानक, सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी प्री-पेड ऑटोरिक्षा सेवा सुरू करण्याची संकल्पना संघटनेने सुचविली आहे. शिवाय प्री-पेड रिक्षा सुरू केल्यास स्थानकांबाहेर बूथ उभारा, जेणोकरून प्रत्येक रिक्षाचालकाची आणि प्रवाशाची नोंदणी होईल. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीला रोख बसेल आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळेल, असा संघटनेचा दावा आहे.
 
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, सीप्झ अंधेरी (पूर्व), मालाड (पुष्पापार्क), सायन, विक्रोळी गोदरेज, गांधी नगर, कांजूरमार्ग, मुलुंड चेकनाका (पश्चिम), ऐरोली सिग्नल, गोरेगाव (ओबेरॉय मॉल), गोरेगाव (आरे कॉलनी), चेंबूर (अमरमहल), चेंबूर (छेडा नगर), पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर चेकनाका, साई सव्र्हिसजवळून अंधेरी (पू), इंडियन ऑइलजवळून अंधेरी (पू), गोरेगाव रेल्वे स्थानक ते नागरी निवारा. 

 

Web Title: 35 thousand illegal auto-rickshaws in the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.