Join us
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये ३५ टक्के सूट, निवडक आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी मर्यादीत ऑफर

By मनोज गडनीस | Updated: March 22, 2024 16:25 IST

या योजनेअंतर्गत २ एप्रिलपर्यंत लोकांना बुकिंग करता येईल व या तिकीटाची कालमर्यादा ३० सप्टेंबरपर्यंत वैध असेल.

मुंबई - आगामी काळातील सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया कंपनीने बिझनेस क्लासने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी ३५ टक्क्यांपर्यंत सूट योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत २ एप्रिलपर्यंत लोकांना बुकिंग करता येईल व या तिकीटाची कालमर्यादा ३० सप्टेंबरपर्यंत वैध असेल.

प्राप्त माहितीनुसार, कंपनीने सिंगापूर, बँकॉक, फुकेट, ढाका, कोलंबो, दुबई, अबुधावी, जेद्दा, बाहरिन, मस्कत आणि कुवेत या आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी या योजनेची घोषणा केली आहे. एकेरी किंवा दुहेरी अशा दोन्ही प्रवाशांसाठी या सूट योजनेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. या आंतरराष्ट्रीय मार्गांवरील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर ही  योजना राबवली जाणार आहे. 

टॅग्स :एअर इंडियामुंबई