अपघातात ३५ प्रवासी जखमी
By Admin | Updated: June 3, 2015 23:10 IST2015-06-03T23:10:10+5:302015-06-03T23:10:10+5:30
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नांदगाव परिसरात लक्झरी बस उलटुन ३५ प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली

अपघातात ३५ प्रवासी जखमी
मनोर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नांदगाव परिसरात लक्झरी बस उलटुन ३५ प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. रस्त्यावर ठिकठिकाणी असलेल्या खड्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली असून कंपनीने रस्त्याच्या दुुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
जखमी प्रवाशांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात जीवीतहाणी झाली नाही. मुंबई-अहमदाबाद या महामार्गाचे सहापदरीकरण झाले मात्र आजही अनेक त्रुट्या आहे. यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत.
आयआरबी कंपनीच्या ठेकेदाराची रस्त्याच्या कामात मनमानी सुरू असून अधिकारीही त्याचीच पाठराखण करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
(वार्ताहर)