कळंबोलीत ३५ बुथमधून डोस

By Admin | Updated: February 22, 2015 22:26 IST2015-02-22T22:26:37+5:302015-02-22T22:26:37+5:30

राष्ट्रीय पोलिओे निर्मूलन मोहिमेअंतर्गत पोलिओ डोस रविवार राबविण्यात आला. त्यानुसार कळंबोलीत नागरी आरोग्य केंद्रा अंतर्गत कळंबोलीत ३५ बूथ मांडण्यात आले होते

35 bullet dosage in Kalamboli | कळंबोलीत ३५ बुथमधून डोस

कळंबोलीत ३५ बुथमधून डोस

कळंबोली : राष्ट्रीय पोलिओे निर्मूलन मोहिमेअंतर्गत पोलिओ डोस रविवार राबविण्यात आला. त्यानुसार कळंबोलीत नागरी आरोग्य केंद्रा अंतर्गत कळंबोलीत ३५ बूथ मांडण्यात आले होते. यामध्ये ३५ बूथमधून ९३२0 डोस बालकांना देण्यात आले.
कळंबोलीत रहदारी सिडको वस्ती, नागरी आरोग्य केंद्र (समाजमंदिर), एमजीएम हॉस्पिटल कळंबोली शहर, नवीन- जुनी सुधागड शाळेजवळ, डॉ. इंदोरी क्लिनिक, सेंट जोसेफ शाळेजवळ, कळंबोली गाव अशा विविध ठिकाणी ३५ बूथचे आयोजन करण्यात आले होते, तर सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत डोस देण्यात आले. प्रत्येक बुथवर तीन व्यक्तींची नियुक्ती होती. कळंबोली नागरी आरोग्य केंद्रातर्फे बाळांना आवश्यक जीवनसत्त्व, गोवर, बी. सी. सी. असे विविध डोस व जनजागृती डॉ. राज चव्हाण यांच्यासोबत एस.एस.खरीवाले, के. एम. पाटील यांनी केली. (वार्ताहर)

Web Title: 35 bullet dosage in Kalamboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.