रस्ता ठेकेदारांना ३४ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 02:11 AM2018-05-22T02:11:50+5:302018-05-22T02:11:50+5:30

पालिकेची कारवाई : कामाच्या ठिकाणी ‘बॅरिकेड्स’ लावणे बंधनकारक

34 lakh penalty for road contractor | रस्ता ठेकेदारांना ३४ लाखांचा दंड

रस्ता ठेकेदारांना ३४ लाखांचा दंड

Next

मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत. खोदकामांमुळे अनेक वेळा पादचारी व वाहनचालकांची गैरसोय होते. तसेच अपघाताचाही धोका असतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कामाच्या ठिकाणी ‘बॅरिकेड्स’ लावणे ठेकेदारांना बंधनकारक आहे. मात्र, अनेक ठिकाणी हा नियम मोडण्यात येत असल्याने ठेकेदारांना कारवाईचा बडगा दाखविण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. या कारवाई अंतर्गत पूर्व उपनगरातील ठेकेदाराला ३४ लाख ८६ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मुंबईत वर्षभरात सुमारे एक हजार रस्त्यांची कामे महापालिकेने हाती घेतली आहेत. पावसाळ्यापूर्वी या खोदकामांच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेड्स लावणे बंधनकारक आहे. मात्र, काही ठेकेदार याकडे दुर्लक्षित करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना दंड आकारण्याचे आदेश आयुक्त अजय मेहता यांनी मासिक आढावा बैठकीत दिले होते. त्यानुसार आता दंड आकारणी करण्यास सुरुवात
झाली आहे. पूर्व उपनगरामध्ये रस्ते कामांच्या ठिकाणी ‘बॅरिकेड्स’ न लावणाऱ्या १९ ठेकेदारांना ३४ लाख ८६ हजार ५०० रुपये एवढा दंड ठोठावण्यात आला आहे. या अंतर्गत सर्वाधिक म्हणजे १२ लाख ८१ हजार ५०० रुपये दंड ‘मे. स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर’ या ठेकेदाराला आकारण्यात आला आहे. याखालोखाल ‘मे. एपीआय सिव्हिलकॉन प्रा. लि.- बिटकॉन इंडिया’ (संयुक्त उपक्रम) सहा लाख रुपये, ‘मे. प्रकाश इंजिनीअर्स अ‍ॅण्ड इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि.’ चार लाख ६६ हजार एवढा दंड आकारण्यात आल्याची माहिती रस्ते खात्याचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी दिली.

१९ कंपन्यांचा समावेश
पूर्व उपनगरात ‘एल’, ‘एम पूर्व’, ‘एम पश्चिम’, ‘एन’, ‘एस’, ‘टी’ या सहा प्रशासकीय विभागांचा समावेश होतो. पूर्व उपनगरांमध्ये रस्त्यांचे काम करणाºया १९ कंपन्यांना ३४ लाख ८६ हजार ५०० रुपये एवढा दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये ‘एल’ विभागातील रस्ते कामात ‘बॅरिकेड्स’ लावण्यात टाळाटाळ करणाºया ठेकेदाराकडून तीन लाख २१ हजार ५००, ‘एम पूर्व’ विभागात एक लाख ८४ हजार ५००, ‘एम पश्चिम’ विभागात २६ लाख ४८ हजार, ‘एन’ व ‘एस’ विभागात प्रत्येकी ६५ हजार आणि ‘टी’ विभागात दोन लाख दोन हजार ५०० दंडाचा समावेश आहे.

या कंत्राटदारांनाही दंड
मे. शांतीनाथ रोडवेज, मे. लॅण्डमार्क कॉर्पोरेशन प्रा. लि., मे. जी. एल. कन्स्ट्रक्शन, मे. ब्युकॉन इंजिनीअर्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., मे. देव इंजिनीअर्स, मे. नवदीप कन्स्ट्रक्शन कंपनी, मे. न्यू इंडिया कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड ग्यान, मे. महावीर रोड्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., मे. न्यू इंडिया कन्स्ट्रक्शन कंपनी, मे. प्रीती कन्स्ट्रक्शन कंपनी, मे. एम. बी. इन्फ्रा प्रोजेक्ट्स, मे. शाह अ‍ॅण्ड पारीख, मे. एम. ई. इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि., मे. एच. व्ही. कन्स्ट्रक्शन, मे. नीव इन्फ्रा लि., सनराईज स्टोन इंडस्ट्रीज या १६ ठेकेदारांना ११ लाख ३९ हजार एवढा दंड बॅरिकेड्स न लावल्याबद्दल ठोठावण्यात आला.

 

Web Title: 34 lakh penalty for road contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.