33 भूखंडांवर उद्याने बहरणार

By admin | Published: October 5, 2014 12:48 AM2014-10-05T00:48:14+5:302014-10-05T00:48:14+5:30

अतिक्रमणापासून मोकळ्या मैदानांना वाचविण्यासाठी मुंबईतील 33 जागांवर उद्याने बहरणार आहेत़

33 plots will grow in the park | 33 भूखंडांवर उद्याने बहरणार

33 भूखंडांवर उद्याने बहरणार

Next
>मुंबई : अतिक्रमणापासून मोकळ्या मैदानांना वाचविण्यासाठी मुंबईतील 33 जागांवर उद्याने बहरणार आहेत़ सुमारे दीड लाख चौ़ मीटरहून अधिक असलेल्या या भूखंडांवर वर्षभरात कामाला सुरुवात होणार आह़े त्यामुळे मोकळा श्वास घेण्यासाठी पर्यटकांना लवकरच हक्काचे ठिकाण मिळणार आह़े 
‘दिल्ली हट’च्या धर्तीवर मुंबईत शिल्पग्राम उभारण्याचा निर्धार पालिकेने केला होता़ परंतु निवडणुकीच्या काळात गेले वर्षभर या कामांना गती मिळाली नाही़ या काळात सर्व आरक्षित भूखंडांच्या विकासाचा आराखडा तयार झाला आह़े त्यामुळे काही महिन्यांतच उद्यानांच्या कामाला सुरुवात होणार आह़े
या प्रकल्पाला विलंब झाल्यामुळे आता दीड वर्षामध्ये उद्यानांच्या विकासाचे लक्ष्य पालिकेने ठेवले आह़े यामध्ये सर्वात मोठय़ा 5क् हजार चौ़मी़ अंधेरीतील भूखंडावर शिल्पग्राम साकार होणार आह़े याव्यतिरिक्त कुर्ला, चेंबूर आणि मानखुर्द या ठिकाणी असलेल्या 27 हजार 844 चौ़मी़ जागेचाही विकास होणार आह़े (प्रतिनिधी)
 
मागील दोन वर्षामध्ये दोनशेहून अधिक भूखंडांचा विकास करण्यात आला आह़े विकासकाकडून टीडीआर घेऊन अनेक ठिकाणी कामे झाली आहेत. अशा पद्धतीने दोनशे मोकळ्या भूखंडांचा विकास झाल्याचा पालिकेचा दावा आह़े
 
यामधील सर्वाधिक भूखंड सायन, माटुंगा या परिसरात आहेत़ बहुतेक उद्यानांच्या विकासाचे काम पूर्ण होत आले आह़े या 33 भूखंडांच्या विकासासाठी 124 कोटी रुपये खर्च अपेक्षित आह़े यामध्ये देखभालाची तरतूदही करण्यात आली आह़े
 
चेंबूर, सायन, कुर्ला, अंधेरी, वरळी, परळ, गोराई, माटुंगा आणि बोरीवली भागामध्ये हे भूखंड आहेत़

Web Title: 33 plots will grow in the park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.