- महेश कोले लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल झालेल्या अत्याधुनिक रडार यंत्रणा असलेल्या इंटरसेप्टर वाहनांच्या माध्यमातून कारवाई सुरू झाली आहे. ११ डिसेंबरपासून सुरू झालेल्या कारवाईच्या माध्यमातून आत्तापर्यंत ३ हजार २३३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक नियमांचे उल्लंघन बाइकस्वारांकडून झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आत्तापर्यंत ३३ लाख रुपयांपेक्षा अधिकचा दंड ठोठावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
परिवहन विभागाने रस्ता सुरक्षा आणखी मजबूत करत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर जरब बसवण्यासाठी ६९ इंटरसेप्टर वाहनांची खरेदी केली होती. या वाहनांवर अत्याधुनिक रडार यंत्रणा बसवण्यात आली असून, या यंत्रणेच्या हाताळणीचे प्रशिक्षण २०० मोटार वाहन निरीक्षक, तसेच सहायक मोटार वाहन निरीक्षकांना गेल्या महिन्यात देण्यात आले होते.
कारवाईची मोहीम अधिक तीव्रतेने राबवण्याचे संकेतइंटरसेप्टर वाहनांच्या माध्यमातून आरटीओने केलेल्या कारवाईमध्ये तब्बल ५४.८ टक्के अर्थात १ हजार ७७२ प्रकरणे हेल्मेट न घालणाऱ्या बाइकचालकांची आहेत. खालोखाल हेल्मेट न घालणारे सहप्रवासी, ओव्हर स्पीड करणाऱ्या आणि सीटबेल्ट न वापरणाऱ्या कारचालकांचा समावेश आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई सारख्या शहरांमध्ये कारवाईसाठी या वाहनांचा वापर करून कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत आरटीओकडून देण्यात आले आहेत.
रडार यंत्रणेचा वापर आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार अपघात प्रवण क्षेत्र, महामार्ग, शहरातील अंतर्गत रस्त्यांवर, तसेच आवश्यक असलेल्या ठिकाणी या वाहनांच्या माध्यमातून कारवाई सुरू केली आहे. रडार यंत्रणेच्या माध्यमातून एका वेळेस ४ प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन शोधण्यास मदत होत असून, तासाभरात शेकडो वाहनांवर कारवाई करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाहनांच्या हालचालींवर स्वयंचलित नजर नव्या इंटरसेप्टर वाहनांमध्ये रडार यंत्रणा, वाय-फाय आणि एनपीआर कॅमेरा आहे. एनपीआर कॅमेरामध्ये इन्फ्रारेड तंत्रज्ञान असल्याने रात्रीच्या वेळेसही प्रभावी कारवाई करणे शक्य होते. अधिकाऱ्यांना फक्त कारवाईसाठी एक विशिष्ट क्षेत्र (झोन) निश्चित करावे लागते. रडार प्रणालीद्वारे वाहनांच्या हालचालींवर स्वयंचलित नजर ठेवली जाते.
Web Summary : Mumbai RTO's new interceptor vehicles have fined 3,233 drivers ₹3.3 million since December 11. Most violations involve bikers without helmets. The RTO plans intensified enforcement using radar technology in accident-prone zones, highways, and city roads, automatically tracking vehicle movements.
Web Summary : मुंबई आरटीओ के नए इंटरसेप्टर वाहनों ने 11 दिसंबर से 3,233 चालकों पर ₹33 लाख का जुर्माना लगाया है। अधिकांश उल्लंघन बिना हेलमेट वाले बाइकर्स से जुड़े हैं। आरटीओ दुर्घटना संभावित क्षेत्रों, राजमार्गों और शहर की सड़कों पर रडार तकनीक का उपयोग करके गहन प्रवर्तन की योजना बना रहा है, जो स्वचालित रूप से वाहन की गतिविधियों पर नज़र रखता है।