Join us

सहा महिन्यांतच पालिकेच्या तिजोरीत ३,१०० कोटी

By सीमा महांगडे | Updated: October 5, 2025 09:02 IST

मालमत्ता कर हे पालिकेच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन असून यंदा मालमत्ता कराच्या बिलामध्ये वाढीव रेडी रेकनर दरानुसार जवळपास १६ टक्के वाढ केली आहे.

- सीमा महांगडे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांतच महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाकडून जवळपास ३ हजार १०० कोटींचा मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे. यंदा पालिकेने ७ हजार ७०० कोटींचा मालमत्ता कर संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एकूण उद्दिष्टाच्या जवळपास ४२ टक्के मालमत्ता कर जमा करण्यास महापालिकेला यश मिळाले आहे.

मालमत्ता कर हे पालिकेच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन असून यंदा मालमत्ता कराच्या बिलामध्ये वाढीव रेडी रेकनर दरानुसार जवळपास १६ टक्के वाढ केली आहे. मात्र २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या सुधारित बिलांच्या छपाईच्या कामकाजाला काही तांत्रिक कारणास्तव उशीर झाला. परिणामी काही विभागात छापील देयके पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे मालमत्ता धारकांना बिलांचा भरणा करण्यासाठी ३ महिन्यांपेक्षा कमी कालावधी मिळाला. पहिल्या ६ महिलांची बिले भरण्यासाठी याआधी १३ ऑगस्ट शेवटची तारीख होती. मात्र मुंबईकरांना काही ठिकाणी बिले उशिरा मिळाल्यामुळे पालिकेने मुदतवाढ दिली आहे. तरीही पहिल्या सहा महिन्यांत एकूण उद्दिष्टांच्या ४२ टक्के कर गोळा करण्यात पालिकेला यश मिळाले आहे.

कर वेळेत न भरल्यास दंडमुंबईकरांना महानगरपालिकेकडून मालमत्ता कर भरण्यासाठी नवीन मुदतवाढ दिली आहे. मात्र या मुदतवाढीच्या अंतिम तारखेनंतरही बिलांचा भरणा न केल्यास थकीत बिलावर नियमानुसार दंड करण्यात येणार असल्याचा इशारा महानगरपालिकेने दिला आहे. 

अंतिम तारखी १ डिसेंबरपर्यंतआर-उत्तर - अशोक वन दहिसर, एक्सर रोडके-पूर्व - विले पार्ले (पू), जेबी नगरएल - एलबीएस रोड, चुनाभट्टी सायन, कुर्लाएन - विद्याविहार, घाटकोपरएस - भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्गटी - मुलुंड, नाहूर

१ नोव्हेंबर २०२६पर्यंत मुदतवाढए - कफ परेड, कुलाबाबी - भेंडी बाजार, मस्जिद बंदरसी - काळबादेवी, चिरा बाजारडी - मलबार हिल, गिरगाव, ग्रांट रोडइ - भायखळा, माझगाव, चिंचपोकळी एफ-उत्तर - सायन कोळीवाडा, अँटॉप हिलजी - दक्षिण -वरळी बीडीडी एच-पूर्व - वांद्रे पूर्व, टीचर्स कॉलनीएच-पश्चिम - सांताक्रूझ पश्चिम, खार के-पश्चिम - चार बंगलो, गिल्बर्ट हिल, वर्सोवापी-दक्षिण - गोरेगाव, राम मंदिर, चिंचोली बंदरपी-उत्तर - मालवणी, मढ, मार्वे रोडआर-मध्य - बोरीवली, कुलपवाडी, वजिरा नाकाआर-दक्षिण - कांदिवली, पोयसर, चारकोपएम-पूर्व/पश्चिम-मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, टिळकनगरएफ-दक्षिण - नायगाव, परळजी-उत्तर - माटुंगा (प), दादर (प) 

English
हिंदी सारांश
Web Title : BMC Collects ₹3,100 Crore Property Tax in Six Months

Web Summary : Mumbai's BMC collected ₹3,100 crore in property tax within six months, 42% of its annual target. Despite billing delays and increased rates, citizens responded well. Extended deadlines are offered, but penalties apply for late payments. Deadlines vary by ward.
टॅग्स :मुंबई महानगरपालिका