युवांसह ज्येष्ठांची ३१ लाख मते निर्णायक
By Admin | Updated: October 7, 2014 00:26 IST2014-10-07T00:26:11+5:302014-10-07T00:26:11+5:30
युवा मतदारांवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा असून त्यांना आकर्षित करण्याची मोठ्या प्रमाणात चढाओढ सुरू आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यात ज्येष्ठ मतदारांची मतेही तितकीच निर्णायक ठरणार आहेत

युवांसह ज्येष्ठांची ३१ लाख मते निर्णायक
पंकज रोडेकर, ठाणे
युवा मतदारांवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा असून त्यांना आकर्षित करण्याची मोठ्या प्रमाणात चढाओढ सुरू आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यात ज्येष्ठ मतदारांची मतेही तितकीच निर्णायक ठरणार आहेत. जिल्ह्यात सुमारे तीन लाख मतदार ६० ते ८० पुढील वयोगटांतील आहेत. तसेच १८ ते ३९ वर्षे वयोगटांतील २७ लाख ९९ हजार ९३८ युवा मतदार आहेत. ही मतेच उमेदवारांना विधानसभेत पाठवणार आहेत.
जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघ असून तेथून एकूण २३८ उमेदवारांचे नशीब ५९ लाख ९० हजार ७६७ मतदारांवर अवलंबून आहे. त्यामध्ये ३० हजार ८३ मतदार
हे १८ वर्षीय आहेत. ५७ हजार
९३४ मतदार १९ वर्षीय असून
७३ हजार २८५ मतदार २० वर्षीय वयोगटांमधील आहेत. २१ वर्षीय मतदारांची संख्या ७४ हजार ५१७ असून २२ वर्षीय मतदारांचा आकडा ७७ हजार ५१३ इतका आहे. तसेच २३ ते २९ या वयोगटांतील मतदारांची संख्या ७ लाख ८६ हजार ३४६ एवढी आहे. सर्वाधिक मतदार ३० ते ३९ या वयोगटांतील असून ही संख्या १७ लाख २६१ इतकी आहे. त्यापाठोपाठ ४० ते ४९ या गटांत १४ लाख ८२ हजार २२६ मतदार आहेत. तर ५० ते ५९
वयोगटांत ९ लाख १५ हजार ९२ मतदार आहेत.
या मतदारांसह ज्येष्ठ मतदारांची मतेही महत्त्वाची आहेत. ६० ते ६९ वयोगटांत ४ लाख ८० हजार १२३ मतदार असून ७०-७९ या वयोगटांत २ लाख १९ हजार ९२९ मतदार आहेत. त्याचबरोबर ८० वर्षांपुढील मतदारांची संख्या ९३ हजार ४५८ इतकी आहे.