मुंबईत एका वर्षात ३० हजार गर्भपात!

By Admin | Updated: July 18, 2015 05:21 IST2015-07-18T05:21:50+5:302015-07-18T05:21:50+5:30

मुंबईत १८ वर्षांवरील विवाहित-अविवाहित महिलांचे २०१३-१४ या एक वर्षात ३० हजार गर्भपात झाले, अशी धक्कादायक माहिती शुक्रवारी विधानसभेसमोर आली.

30,000 abortions in one year in Mumbai! | मुंबईत एका वर्षात ३० हजार गर्भपात!

मुंबईत एका वर्षात ३० हजार गर्भपात!

मुंबई : मुंबईत १८ वर्षांवरील विवाहित-अविवाहित महिलांचे २०१३-१४ या एक वर्षात ३० हजार गर्भपात झाले, अशी धक्कादायक माहिती शुक्रवारी विधानसभेसमोर आली.
गर्भपाताचे किट आणि कामोत्तेजक औषधांची आॅनलाइन विक्री प्रचंड प्रमाणात होत असून, या विक्रीला पायबंद घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात आली आहे, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.
उत्तर नागपूरचे भाजपा आमदार डॉ. मिलिंद माने यांनी लक्षवेधीद्वारे एका महत्त्वाच्या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले, माहिती अधिकारात सरकारकडून मिळालेली आकडेवारी धक्कादायक आहे. मुंबईत १८ वर्षांवरील विवाहित, अविवाहित महिलांचे ३० हजार गर्भपात झाले, तर १८ वर्षांखालील अल्पवयीन १७०० मुलींचे गर्भपात झाले. शिवाय, ही आकडेवारी सरकारी असून एकट्या मुंबईत एवढे गर्भपात होत असतील तर राज्याची स्थिती काय असेल, असा सवाल माने यांनी केला.
डॉ. माने यांनी सभागृहात दिलेल्या माहितीला महसूलमंत्री खडसे यांनी दुजोरा देत गर्भपात आणि कामोत्तेजक औषधांची आॅनलाइन विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)

आॅनलाइन विक्रेत्यांवर गुन्हा
गर्भपात आणि कामोत्तेजक औषधांची आॅनलाइन विक्री करणाऱ्या स्नॅपडील डॉट कॉमची संस्था जस्पर इन्फोटेक प्रा. लि. आणि शॉपक्लुज डॉट कॉमची संस्था मे. क्लुज नेटवर्क प्रा. लि. या संस्थांचे कार्यकारी अधिकारी आणि संचालक विक्रेते यांच्यावर विना परवाना औषध विक्री व इतर उल्लंघनाबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती खडसे यांनी दिली.

कठोर कायद्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा
आॅनलाइन औषधे विक्र ी करणाऱ्या कंपन्या या परदेशातून विक्र ी करतात. भारतात त्यांची कुठेही कार्यालये नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई कशी करणार, असा प्रश्न पडतो. याबाबत केंद्रीय कायदे अधिक कठोर करण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत असल्याचे खडसे यांनी सांगितले.

Web Title: 30,000 abortions in one year in Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.