सायन-कोळीवाड्यात ३०० मतदान यंत्रे
By Admin | Updated: October 8, 2014 23:07 IST2014-10-08T23:07:13+5:302014-10-08T23:07:13+5:30
अवघे काही दिवस मतदानाला राहिले असून, प्रत्येक मतदारसंघात निवडणूक अधिकाऱ्यांकडून चांगलीच तयारी केली जात आहे

सायन-कोळीवाड्यात ३०० मतदान यंत्रे
मुंबई : अवघे काही दिवस मतदानाला राहिले असून, प्रत्येक मतदारसंघात निवडणूक अधिकाऱ्यांकडून चांगलीच तयारी केली जात आहे. सायन-कोळीवाड्यात मतदानासाठी ३०० यंत्रे तयार ठेवण्यात आली आहेत.
सायन-कोळीवाडा मतदारसंघात सध्या २ लाख ५४ हजार १६३ मतदार असून, यामध्ये १ लाख ४३ हजार ५७५ पुरुष, १ लाख ७ हजार ७१५ महिला, सेना दलातील १८ आणि इतर मतदार ३५ आहेत. १५ आॅक्टोबर रोजी सायन कोळीवाड्यात मतदानादिवशी निवडणूक अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तयार ठेवण्यात आला आहे. तब्बल ८५0 पेक्षा अधिक कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त राहणार आहेत. त्याचप्रमाणे २७४ बुथवर तेवढीच मतदान यंत्रे असणार आहेत. मतदानाच्या दिवशी कुठल्याही मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास तत्काळ मशिन उपलब्ध व्हावे, यासाठी २६ जादा मशिन्स ठेवण्यात येणार आहेत. सध्या कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रणेबाबतचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एम.एल. संख्येंनी सांगितले.