३० नव्या लोकल मार्च २0१६पर्यंत

By Admin | Updated: May 11, 2015 04:11 IST2015-05-11T04:11:22+5:302015-05-11T04:11:22+5:30

उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) आणखी ३0 नव्या लोकल (बम्बार्डियर) मार्च २0१६पर्यंत टप्प्याटप्प्यांत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

30 new locals till March 2016 | ३० नव्या लोकल मार्च २0१६पर्यंत

३० नव्या लोकल मार्च २0१६पर्यंत


मुंबई : उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) आणखी ३0 नव्या लोकल (बम्बार्डियर) मार्च २0१६पर्यंत टप्प्याटप्प्यांत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एमयूटीपी-२ अंतर्गत याआधी दोन नव्या लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. येणाऱ्या सर्व नव्या लोकल या पश्चिम रेल्वेवरच चालविण्याचा विचार केला जात आहे.
पश्चिम आणि मध्य रेल्वेमार्गावर सध्या सिमेन्स कंपनीबरोबरच भेल कंपनीच्या आणि रेट्रोफिटेड लोकलही धावत आहेत. बरीच वर्षे जुन्या लोकल धावत असतानाच वाढती प्रवासी संख्या आणि कमी पडणाऱ्या लोकल तसेच त्यांच्या फेऱ्या पाहता नवीन लोकल एमआरव्हीसीच्या एमयूटीपी-२ प्रकल्पांतर्गत आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
या लोकलची बांधणी चेन्नईतील आयसीएफमध्ये (इंटीग्रल कोच फॅक्टरी) केली जात आहे.
अशा ७२ नव्या लोकलपैकी (बम्बार्डियर) २ लोकलची चाचणी करून त्या पश्चिम रेल्वेमार्गावर चालविण्यात येत आहेत.
या लोकल प्रवाशांच्या पसंतीस उतरतात का, याची चाचपणी एमआरव्हीसीकडून एका सर्व्हेतून प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेऊन केली जात आहे.
हा सर्व्हेही पूर्ण झाला असून, ही लोकल प्रवाशांच्या पसंतीस उतरल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगतात. हे पाहता आता एमआरव्हीसीने आणखी ३0 नव्या लोकल टप्प्याटप्प्यांत मार्च २0१६पर्यंत मुंबईत आणण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित ४0 नव्या लोकल या वर्षभरात येतील, असे एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी सांगितले.

Web Title: 30 new locals till March 2016

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.