Join us  

नितीन सरदेसाईंच्या मुलाच्या बनावट सह्या करून तीन कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 5:38 AM

५ जुलै २०१८ ते १२ फेब्रुवारी २०२१ दरम्यान ही फसवणूक झाली आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांचा मुलगा यश यांच्या बनावट सह्या करून त्यांची सव्वातीन कोटींना फसवणूक झाली आहे. ही बाब समोर येताच यश सरदेसाई यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. याप्रकरणी माहीम पोलिसांनी शनिवारी आविष्कार डेव्हलपरचे मॅनेजिंग डायरेक्टर विजय वैद्य यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

यश सरदेसाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ५ जुलै २०१८ ते १२ फेब्रुवारी २०२१ दरम्यान ही फसवणूक झाली आहे. विजय वैद्य हे स्वतः डायरेक्टर असल्याचे नमूद करत पार्टनर म्हणून यश यांच्या सह्या असलेल्या कराराची प्रत त्यांच्या हाती लागली. यावर साक्षीदार म्हणून सागर बुगडे यांची सही होती. त्यांनी,  सागरकडे ॲग्रीमेंटबाबत विचारताच, ते विजय वैद्य यांनी तयार केल्याचे सांगितले. तसेच, यश यांना देखील सही करण्यास सांगणार असल्याचे सांगितले. त्यांनी, वैद्यकडे चौकशी करताच, त्यांनी पैशांची गरज असल्याने कोणालाही कल्पना न देता सदर फ्लॅटचे बनावट करारपत्र बनवून त्यावर यश यांच्या खोट्या सह्या करून फ्लॅट नीलेश सांबरे यांना विकल्याचे कबूल करताच त्यांना धक्का बसला. 

असा बसला फटकाजिजाऊ कन्स्ट्रक्शन या कंपनीकडून श्री दत्त डेव्हलपर्सच्या बँक खात्यात ३ कोटी पेक्षा जास्त रक्कम आल्याचे दिसून आले. वैद्य यांनी ती रक्कम वैयक्तिक बँक खात्यावर व आविष्कार डेव्हलपर फर्म या कंपनीच्या खात्यावर वळते करून घेतल्याचे स्पष्ट झाले. 

टॅग्स :नितीन सरदेसाईमनसे