Join us  

कोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 2:58 AM

२२ मार्च ते २६ सप्टेंबरपर्यंत संचारबंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी २ लाख ७० हजार ५७१ गुन्हे नोंद झाले आहेत

मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोरोना, लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २८ कोटी ४० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विविध आयुक्तालय आणि अधीक्षक कार्यालयातून ही आकारणी करण्यात आल्याचे गृहविभागाने स्पष्ट केले.२२ मार्च ते २६ सप्टेंबरपर्यंत संचारबंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी २ लाख ७० हजार ५७१ गुन्हे नोंद झाले आहेत. त्याबाबत ३७ हजार ४२ व्यक्तींना अटक करण्यात आली, तर गुन्हांसाठी संबंधितांकडून २८ कोटी ४० लाख ६० हजार २६४ रुपये दंड वसूल करण्यात आला.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यापोलिस