कोल्हापूर विमानतळावरील प्रवासी संख्येत २६ टक्के घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:09 IST2021-05-05T04:09:27+5:302021-05-05T04:09:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सर्वाधिक झळ हवाई वाहतूक क्षेत्राला बसली आहे. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये देशांतर्गत ...

कोल्हापूर विमानतळावरील प्रवासी संख्येत २६ टक्के घट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सर्वाधिक झळ हवाई वाहतूक क्षेत्राला बसली आहे. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये देशांतर्गत प्रवाशांची संख्या ४० टक्क्यांनी कमी झालेली असतानाच कोल्हापूर विमानतळावरील प्रवासी संख्येत गेल्या तीन महिन्यांत सुमारे २६ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.
कोल्हापूर विमानतळावरून प्रामुख्याने बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, तिरुपती आणि मुंबईसाठी विमानसेवा दिली जाते. पहिल्या लॉकडाऊन काळात २५ मेपासून देशांतर्गत हवाई वाहतुकीवरील निर्बंध शिथिल केल्यानंतर डिसेंबरपासून प्रवाशांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली होती. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये हवाई वाहतूक पूर्वपदावर येत असल्याचे चित्र असतानाच पुन्हा कोरोनासंसर्ग वाढू लागल्याने एप्रिलमध्ये प्रवाशांनी विमान प्रवासाकडे पाठ फिरवली. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर विमानतळावरून फेब्रुवारी महिन्यात ९,४०१, मार्च ९,७७३, तर एप्रिलमध्ये ६,९१६ प्रवाशांनी प्रवास केला.
...........................