Join us  

२६ एसी इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत रुजू; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2020 12:56 AM

केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या ‘फेम २’ उपक्रमांतर्गत ३४० बस गाड्या मंजूर झाल्या आहेत. यापैकी २६ बसगाड्या शनिवारी बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या.

मुंबई : वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी टाटा मोटर्सच्या २६ वातानुकूलित बसगाड्या शुक्रवारी बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या बसेसचे लोकार्पण करण्यात आले.

केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या ‘फेम २’ उपक्रमांतर्गत ३४० बस गाड्या मंजूर झाल्या आहेत. यापैकी २६ बसगाड्या शनिवारी बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या. नरिमन पॉइंट येथे आयोजित लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे आदी उपस्थित होते.सुरक्षेच्या दृष्टीने या बसमध्ये अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. दिव्यांग प्रवाशांना चढण्या-उतरण्यात समस्या येऊ नये यासाठी इलेक्ट्रिक लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे.

मुख्यमंत्र्यांनी केला बसमधून प्रवासमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बसेसची पाहणी केली. या इलेक्ट्रिक बसमधून प्रवासही केला. तर, शाश्वत आणि वातावरणातील बदलासाठी अशा इलेक्ट्रिक बससारखे उपक्रम राबविले पाहिजेत. तसेच मुंबईकरांचा प्रवास कसा सुखकर राहील याकडे लक्ष देण्यात येईल, असे या वेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :उद्धव ठाकरे