Join us
Daily Top 2Weekly Top 5

२५ मालमत्तांनी थकवला ७५ कोटींचा मालमत्ता कर; लिलावाची नोटीस; २१ दिवसांची अंतिम मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 14:27 IST

पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने आतापर्यंत जवळपास ८५ टक्के मालमत्ता कर गोळा केला आहे. ३१ मार्चपर्यंत १०० टक्के कर संकलित करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिल्या आहेत. थकीत मालमत्ताधारकांविरोधात जप्तीची कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

मुंबई : मालमत्ता कर थकविल्याने मुंबई महापालिकेने आतापर्यंत सहा हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी, तर ४८३ मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. याशिवाय २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित होती. त्यापैकी २५ मालमत्तांना लिलावाची नोटीस बजावली आहे. या मालमत्तांचा मूळ थकीत कर ४५ कोटी ६७ लाख असून, त्यावरील दंडाची रक्कम २९ कोटी रुपये आहे. या मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी २१ दिवसांची मुदत दिली आहे. 

पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने आतापर्यंत जवळपास ८५ टक्के मालमत्ता कर गोळा केला आहे. ३१ मार्चपर्यंत १०० टक्के कर संकलित करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिल्या आहेत. थकीत मालमत्ताधारकांविरोधात जप्तीची कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

प्रक्रिया काय? -मालमत्ता कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या, तसेच आर्थिक क्षमता असूनही कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना सुरुवातीला अटकवणीची नोटीस देण्यात येते. मात्र, त्यानंतरही टाळाटाळ झाल्यास लिलावाची नोटीस जारी करून मालमत्तेतील वस्तू जप्त करून त्यांचा लिलाव केला जातो. 

English
हिंदी सारांश
Web Title : 25 Properties Owe ₹75 Crore in Tax; Auction Notice Issued

Web Summary : Mumbai municipality issued auction notices to 25 properties for ₹75 crore unpaid tax. Despite collecting 85% of property tax, the municipality is intensifying actions against defaulters to achieve 100% collection by March 31, including property seizures and auctions after initial warnings are ignored.
टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई