पाइपलाइन फुटल्याने 25 टक्के पाणीकपात

By Admin | Updated: August 19, 2014 02:53 IST2014-08-19T02:53:10+5:302014-08-19T02:53:10+5:30

पाणीकपातीतून सुटका होत नाही तोच मुंबईकरांना पुन्हा पुढील दोन दिवस 25 टक्के कपातीचा सामना करावा लागणार आह़े

25 percent watercourse due to pipelines | पाइपलाइन फुटल्याने 25 टक्के पाणीकपात

पाइपलाइन फुटल्याने 25 टक्के पाणीकपात

ठाण्यातील घटना : मुंबईकरांवर दोन दिवस कपातीचे संकट 
मुंबई : पाणीकपातीतून सुटका होत नाही तोच मुंबईकरांना पुन्हा पुढील दोन दिवस 25 टक्के कपातीचा सामना करावा लागणार आह़े ठाणो येथे तानसा मुख्य जलवाहिनी आज सकाळी फुटल्यामुळे लाखो लीटर पाणी वाहून गेल़े त्यामुळे मुंबई शहर व उपनगरांत पाणीकपात लागू करण्यात येणार आह़े पूर्व उपनगरांत 1क् टक्के पाणीकपात असेल. 
मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव 85 टक्के टक्के भरले आहेत. त्यामुळे पालिकेने नुकतीच 1क् टक्के पाणीकपात रद्द केली होती़ मात्र ठाणो येथे वर्तकनगरमधून जाणारी 18क्क् मिमी तानसा मुख्य जलवाहिनी सोमवारी सकाळी फुटली़ यामुळे लाखो लीटर पाणी स्थानिक लोकवस्तीमध्ये शिरल़े पालिकेच्या जल अभियंता खात्याने ज्यादा कामगार लावून तत्काळ त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेतल़े परंतु या कामासाठी दोन दिवस लागणार आहेत़ या जलवाहिनीतून शहर व पश्चिम उपनगरांना पाणीपुरवठा होत असतो़ त्यामुळे शहर व पश्चिम उपनगरांत 19 व 2क् ऑगस्ट असे दोन दिवस 25 टक्के तर पूर्व उपनगरांत 1क् टक्के पाणीकपात असणार आह़े   (प्रतिनिधी)
 
 ठाण्यातील वर्तकनगर, भीमनगर परिसरातून जाणारी मुंबई महापालिकेची जलवाहिनी सोमवारी सकाळी फुटल्याने सदर परिसर जलमय झाले होते. तसेच लाखो लीटर पाणी वाया गेले असून, पाइपलाइन परिसरातील सुमारे 25क् ते 3क्क् घरांत पाणी शिरले. त्यामुळे गृहोपयोगी वस्तू वाचविण्यासाठी रहिवाशांची धावाधाव झाली. या वेळी विजय देवर हा 7 वर्षीय चिमुरडा जखमी झाला. - वृत्त/4

 

Web Title: 25 percent watercourse due to pipelines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.