झोपडीपट्टीत सापडले २५ लाखांचे सोने

By Admin | Updated: May 24, 2014 23:57 IST2014-05-24T19:44:45+5:302014-05-24T23:57:42+5:30

शहरातील शांतीनगर या झोपडप˜ी भागात पिराणीपाड्यातील एका खोलीत २५ लाखांचे एक किलो सोन्याचे दागिने सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

25 lakhs of gold found in the slum | झोपडीपट्टीत सापडले २५ लाखांचे सोने

झोपडीपट्टीत सापडले २५ लाखांचे सोने

भिवंडी - शहरातील शांतीनगर या झोपडप˜ी भागात पिराणीपाड्यातील एका खोलीत २५ लाखांचे एक किलो सोन्याचे दागिने सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पिराणीपाड्यात राहणार्‍या अफजाब मेहबूब अहमद अन्सारी याच्याकडे चोरीतून मिळवलेले सोन्याचे दागिने असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याला मिळाली असता शुक्रवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.डी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने छापा टाकला असता बेडच्या लाकडी बॉक्समध्ये ठेवलेल्या डब्यात सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या, चेन, मंगळसूत्र, हार असे २५ लाख रुपयांचे एक किलो सोन्याचे दागिने सापडले. हे दागिने जप्त करून पोलिसांनी अफताब अन्सारी याच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अफताब पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे.
. (प्रतिनिधी/ पंढरीनाथ कुंभार)

Web Title: 25 lakhs of gold found in the slum