Join us  

२३ वर्षाच्या प्रतिकने बनवला कोरो - बॉट 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 8:23 PM

वॉर्ड बॉईज , परिचारिकांचा ताण कमी करण्यासाठी करणार मदत; पेटंट प्रक्रिया सुरु, प्रायोगिक तत्त्वावर कल्याणाच्या होली क्रॉस रुग्णालयात रोबो करत आहे मदत

 

मुंबई : अत्यावश्य्क सेवेतील कोरोना रुग्णांच्या सेवेत असणाऱ्या वॉर्ड बॉईज, परिचारिका आणि आरोग्य सेवेतील कर्मचारी यांच्यावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आता कोरोबॉट मदत करणार आहे. कोरोना रुग्णांची सुश्रुषा करण्यापासून ते त्यांचे मनोरंजन करण्यापर्यंत डिझाईन करण्यात आलेला रोबॉट ठाण्याच्या २३ वर्षीय प्रतीक तिरोडकरने बनविला आहे. प्रायोगिक तत्त्वावर प्रतीकचा हा कोरोबॉट कल्याणच्या  होली क्रॉस रुग्णालयातील कोरोना रुग्णांची सेवा करत असून अशा आणखी २० कोरोबॉटच्या निर्मितीमध्ये सध्या प्रतीक व्यस्त आहे. कोरोबॉटचे वैशिष्ट्य म्हणजे यामुळे परिचारिका , आरोग्य कर्मचारी यांचा कोरोना रुग्णांशी फारसा संबंध येणार नसून त्यांच्यामध्ये कोरोनासंसर्गाची शक्यता नक्कीच कमी होऊ शकेल. शिवाय कोरोबॉट रुग्णांना अन्नपाणी आणि औषधे पुरवण्याचे काम करत असून कॅमेर्‍याच्या मदतीने तो रुग्णांशी संवाद साधत असल्याने रुग्णाचेही मनोरंजन होत आहे.खारघरच्या भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून २०१९ या वर्षी  इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनियरिंग मध्ये पदवी घेतलेल्या प्रतीकच्या कोरोबॉटचे हे तिसरे व्हर्जन असल्याची माहिती त्याने दिली. याची निर्मिती त्याने त्याच्या पीएनटीया कंपनीमध्येच लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची आवश्यकता पाहून केली असल्याची माहिती त्याने दिली.

 

 

 

 

 

कोरो बॉटमध्ये एक डिस्प्ले स्क्रीन, कॅमेरा आणि एक स्पीकरदेखील आहे. तसेच त्यात सॅनिटायझर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चार तासांच्या चार्जिंगनंतर सहा ते आठ तास तो कार्यरत राहील. इंटरनेटच्या माध्यमातून कार्यान्वित केला जाणार असल्याने त्याला अंतराचे बंधन नाही. प्रतिकने तयार केलेला आणि प्रत्यक्षात वापरात आलेला हा पहिलाच रोबो आहे. अन्नपदार्थ, औषधे, फळे ठेवण्यासाठी ट्रेची रचना यामध्ये करण्यात आली आहे. साठवणुकीची व्यवस्थाही आहे.पाणी, औषधे, अन्न देणाऱ्या ट्रेमध्ये सेन्सर्स लावण्यात आले असून ते स्वयंचलितपणे हाताच्या हालचालीवर काम करतात यातून सुलभतेबरोबरच वस्तूंचा अपव्यय टळतो अशी माहिती प्र्तिकने दिली. या रोबो मध्ये एलईडी लाईट च्या मदतीने प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे त्याचे रात्री संचालन करणेदेखील शक्य होते यावर एक छोटेसे संगणकवजा उपकरणही लावण्यात आले आहे ज्यातून छोटी-मोठी कामे तसेच मनोरंजनाची सोय होतेलॉकडाउनच्या काळात रोबो बनवण्यासाठी ची उपकरणे मिळणे अवघड झाले असताना सहकाऱ्यांच्या मदतीने रोबोटच्या पार्ट्सची निर्मिती ही केली.  या रोबोच्या संचलनासाठी प्रतीक आणि त्याच्या टीमने एक स्पेशल अॅप  बनवले आहे जे इंटरनेटचा वापर करून या रोबोचे दूर ठिकाणावरून संचालन देखील शक्य बनवते. पंधरा ते वीस दिवसात निर्मिती करण्यात आलेल्या या अनेक रोबोसाठी त्याला १ ते दीड लाख खर्च आला असून त्याच्या वेगवेगळ्या स्टेजप्रमाणे त्याच्या खर्चाची मर्यादा साडेतीन लाखपर्यंत जात असल्याची माहिती त्याने दिली.  प्रतीकांच्या या कोरोबॉटच्या पेटंटची प्रक्रिया सुरु असून लवकरच त्याला ते मिळेल अशी माहितीही त्याने दिली.

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यातंत्रज्ञानकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस