Join us  

Coronavirus In Maharashtra: राज्यभरात गेल्या २४ तासांत २२९४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; २८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 11:31 PM

आजपर्यंत एकूण ६४,०१,२८७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २२९४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात १,८२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

आजपर्यंत एकूण ६४,०१,२८७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के एवढं झालं आहे. नव्या बाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने या आजाराने होत असलेल्या मृतांची संख्याही कमी होत आहे. राज्यात आज २८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,०१,९८,१७३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,७७,८७२(१०.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४१,८९२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १,०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या