मुंबईतून २,२०० रेमडेसिविर इंजेक्शन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:06 IST2021-04-21T04:06:19+5:302021-04-21T04:06:19+5:30
पोलिसांसह एफडीएचे अंधेरी, न्यू मरिन लाइन्स येथे छापे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना उपचारात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या रेमडेसिविर औषधांचा ...

मुंबईतून २,२०० रेमडेसिविर इंजेक्शन जप्त
पोलिसांसह एफडीएचे अंधेरी, न्यू मरिन लाइन्स येथे छापे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना उपचारात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या रेमडेसिविर औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. मंगळवारी मुंबई पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) मदतीने मरोळ आणि न्यू मरिन लाइन्स येथे छापे टाकून २ हजार २०० रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले.
मुंबईत काही वितरकांनी रेमडेसिविरचा साठा करून ठेवल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार, मंगळवारी मुंबई पोलीस आणि एफडीएच्या पथकाने अंधेरीतील मरोळ आणि न्यू मरिन लाइन्स येथे छापा टाकला. या कारवाईत मरोळ येथून २ हजार आणि न्यू मरिन लाइन्स येथून २०० इंजेक्शन मिळून एकूण २ हजार २०० रेमडेसिविर जप्त करण्यात आले. हा सर्व साठा एफडीएला देण्यात आला असून, तो रुग्णालयाला देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी दिली, तसेच याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.