बारवर छापा टाकून २२ जणांना अटक
By Admin | Updated: June 20, 2016 02:47 IST2016-06-20T02:47:56+5:302016-06-20T02:47:56+5:30
विनापरवाना डान्स सुरू असलेल्या सिल्वर पॉइंट या डान्स बारवर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी रात्री कारवाई केली. या कारवाईत बार मालकासह २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बारवर छापा टाकून २२ जणांना अटक
नवी मुंबई : विनापरवाना डान्स सुरू असलेल्या सिल्वर पॉइंट या डान्स बारवर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी रात्री कारवाई केली. या कारवाईत बार मालकासह २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तुर्भे एमआयडीसी येथील सिल्वर पॉइंट बारमध्ये विनापरवाना डान्स सुरू असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक निरीक्षक शेडगे यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी महिला वेटर डान्स करताना आढळून आल्या. त्यानुसार बारमालक हरीश शेट्टी याच्यासह ११ महिला डान्सर, २ वेटर व ८ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात विनापरवाना सुरू असलेल्या लेडीज बारच्या विरोधात पोलिसांनी मागील काही दिवसांपासून धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे. (प्रतिनिधी)